Sunday, May 31, 2026
Homeगडचिरोलीकारागृहातील बंदींसाठी 'जीवन गाणे गातच जावे' सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न...

कारागृहातील बंदींसाठी ‘जीवन गाणे गातच जावे’ सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :- ‘जीवन गाणे गातच जावे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन,सांस्कृतिक कार्य विभाग व कारागृह संचालनालय यांच्या वतीने आज,मंगळवार २५ मार्च रोजी गडचिरोली जिल्हा कारागृहात संपन्न झाले असून मनोरंजन,प्रबोधन, जनजागृती आणि मार्गदर्शन करणारा हा कार्यक्रम कारागृहातील बंदींसाठी जीवनातील नवचैतन्याचा अनुभव ठरला.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती आर.आर.पाटील यांच्या हस्ते पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कारागृहाचे अधीक्षक सुभाष सोनवने होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, पत्रकार मिलींद उमरे,वरिष्ठ तुरुंग अधिकारी आनंद कोकाटे,तुरुंग अधिकारी महेशकुमार माळी,आरोग्य अधिकारी डॉ.बोधीरत्न भडके उपस्थित होते.
न्यायमूर्ती आर.आर.पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “कला आणि सांस्कृतिक उपक्रमातून माणसात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपल्यातील कलागुणांना वाव द्या,चिंतनशील राहा आणि आनंद जोपासत विधायक कार्याकडे वळण्याचे त्यांनी आवाहन केले.
कारागृह अधीक्षक सुभाष सोनवने म्हणाले की, “संगीत,कला आणि सृजनशीलता जीवनाच्या अंधारातही आशेचा किरण निर्माण करू शकतात. चुका प्रत्येकाच्या आयुष्यात होतात,पण त्या चुका स्वीकारून नव्याने सुरुवात करता येते.” त्यांनी बंद्यांना या कार्यक्रमाचा मन:पूर्वक आनंद घेण्याचे आवाहन केले.जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी सकारात्मक परिवर्तनासाठी अशा सांस्कृतिक उपक्रमांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.कारागृह हे केवळ शिक्षा भोगण्याचे नव्हे तर परिवर्तनाचे स्थळ आहे.शासन बंद्यांच्या मानवाधिकारांची जपणूक करते व त्यांच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देते. कारागृहातील निवांत वेळ आणि शांतता ही आत्मचिंतनासाठी मोठी संधी असल्याचे ते म्हणाले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार मिलींद उमरे यांनी केले.कार्यक्रमात शास्त्रीय नृत्य,देशभक्तिपर गीतं, चित्रपट गीते यांची रंगतदार सादरीकरणे करण्यात आली.तसेच,योगासने आणि मानसिक आरोग्यावर आधारित सत्रेही घेण्यात आली.योग प्रशिक्षक अंजली कुळमेथे,शास्त्रीय नृत्य प्रशिक्षक स्मिता खोब्रागडे, गायक दीपक मोरे,शिल्पा अलोन व शैलेश देशकर तसेच कारागृह प्रशासनाचे अधिकारी,कर्मचारी तसेच कारागृहातील बंदी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,रविवार ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरातील...

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!