- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नागपूरच्या कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज,बुधवार १२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला; तर कारचालक मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना पावनगाव ते भरतवाडा वाय पॉईंट मार्गावर घडली.
एका मित्राचा वाढदिवस असल्याने मिहीर आनंद बेहार,भौमिक अमोल लारोकर आणि सागर संजय मेलवाणी हे तिघे मित्र एकत्र गोळा झाले होते.दरम्यान, मिहीर याने आपल्या वडिलांची कार आणली होती.इतर मित्र येण्यास वेळ असल्याने तिघेही कार घेऊन फेरफटका मारू लागले.दरम्यान,कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पावनगाव-भरतवाडा मार्गावर मिहीरचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले.याचवेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला कारने मागून जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की कार पूर्णपणे क्षतिग्रस्त होऊन भौमिक लारोकर आणि सागर मेलवाणी यांचा जागीच मृत्यू झाला.तर कार चालवणारा मिहीर बेहार गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.जखमीला तातडीने तारांगण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.घटनेने परिसरात व मित्रपरिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

