उद्रेक न्युज वृत्त
नागपूर : – कापूस वेचणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला.त्यानंतर तिची हत्या करण्यात आली.हत्या केल्यानंतरही तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी आबू ऊर्फ दिनेश उईके, नंदकिशोर उईके आणि सिद्धार्थ पाटील या तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील खापा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरेवानी गावात काही दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह शेतात बेवारस अवस्थेत आढळूनआला होता. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आता धक्कादायक खुलासा समोर आला आहे.या प्रकरणात तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, महिला शेतात कापूस वेचण्यासाठी गेली होती.ती शेतात एकटी असल्याचे पाहून तीनजण तिच्याजवळ आले. आजूबाजूला कुणी नसल्याचे पाहून या तिघांनी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.महिलेने यास विरोध करताच तिघांनी महिलेला बेदम मारहाण करत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.यावरच न थांबता त्या तिघांनी तिची कुन्हाडीने वार करत हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहावरही सामूहिक बलात्कार केला.तिच्या पतीला वाघाच्या शिकारीच्या गुन्ह्यात अटक झाली असून,तो सध्या कारागृहात असल्याने ती शेतीची कामे करत होती.