Friday, May 15, 2026
Homeउमरेडकडक उन्हाच्या झळा सहन करत बसलेल्या प्रवाशांना दिलासा; माजी आमदारांनी एक फोन...

कडक उन्हाच्या झळा सहन करत बसलेल्या प्रवाशांना दिलासा; माजी आमदारांनी एक फोन घुमवला अन्..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
उमरेड(नागपूर):-आज दुपारचे एक वाजले होते.कडक उन्हाच्या झळा सहन करत उमरेडच्या आगारात नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती.उमरेड आगारातून सुटणारी उमरेड-हिंगणा ही बस नियोजित वेळेत न आल्याने सुमारे दीडशे ते दोनशे प्रवासी उष्णतेत प्रतीक्षा करत उभे होते.अनेकजण तातडीच्या कामानिमित्त निघालेले असतांना,बस विलंबामुळे त्यांना शारीरिक थकवा आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता.विशेष म्हणजे,चौकशी कक्षाकडूनही प्रवाशांना समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते महेश बिपटे यांनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतला आणि ही बाब तात्काळ उमरेड विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुधीर पारवे यांच्या निदर्शनास आणून दिली. परिस्थितीची जाणीव होताच पारवे यांनी क्षणाचाही विलंब न लावता आगारप्रमुखांना कॉन्फरन्स कॉलवर घेतले व सविस्तर चर्चा केली.या चर्चेनंतर अवघ्या पाच मिनिटांच्या आत बसचे नियोजन करण्यात आले.यामुळे बसस्थानकात उभ्या असलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळून कडक उन्हात होणारी प्रतीक्षा थांबली आणि प्रवासाचा मार्ग मोकळा झाला.या तात्काळ आणि संवेदनशील हस्तक्षेपाबद्दल बसस्थानकावर उपस्थित प्रवासी,महिला,ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग बांधवांनी माजी आमदार सुधीर पारवे यांचे मनःपूर्वक आभार मानले. “गरजेच्या वेळी धावून येणारा लोकप्रतिनिधी” अशी भावना अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.या कृतीतून पारवे यांनी पुन्हा एकदा सामान्य नागरिकांप्रती असलेली बांधिलकी आणि तत्परता दाखवून दिली,अशी प्रतिक्रिया उपस्थितांकडून देण्यात आली.उष्णतेच्या तडाख्यात अडकलेल्या प्रवाशांना त्वरित दिलासा देत,लोकांच्या अडचणी सोडविण्यात पारवे यांनी दाखविलेली कार्यतत्परता सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२४ वर्षीय तरुण आणि १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह करण्याच्या तयारीत असतांनाच धडकले पथक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार अल्पवयीन विवाह हा कायदेशीर गुन्हा आहे.त्याचे गंभीर परिणाम होत असतांनाही बालविवाहाच्या तयारीत असलेल्या मंडपात चाईल्ड हेल्पलाईन...

एचटीबीटी कापूस बियाण्यांची अवैधरित्या साठवणूकीवर धाड; ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील रामसागर येथे संशयित अनधिकृत एचटीबीटी(HTBT) कापूस बियाण्यांची अवैधरित्या साठवणूक व विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाच्या...

गडचिरोली जिल्ह्यात स्मार्ट प्रकल्पामुळे कृषी क्षेत्रात उद्योगक्रांती.. – आरमोरी,कुरखेडा,देसाईगंज,मुलचेरा व अन्य तालुक्यात विविध प्रकल्प कार्यान्वित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन(SMART)प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्यात कृषी क्षेत्रात उद्योगक्रांती घडतांना दिसत आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून धान, मका...

विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी टीईटी क्रॅश कोर्सचे आयोजन; नोंदणी करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने अनुसूचित जमातीच्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-टीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी टीईटी क्रॅश कोर्स...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!