उद्रेक न्युज वृत्त :-अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या वतीने येत्या,बुधवार २० मे रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे.या बंदच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना औषधांची टंचाई भासू नये आणि त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये,यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने आधीच कंबर कसली आहे.या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना आवश्यक औषधसाठा सज्ज ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने २० मे २०२६ रोजी औषधांची दुकाने बंद राहणार आहेत.या एकदिवसीय संपाचा सर्वाधिक परिणाम लहान शहरे आणि गावांमध्ये होण्याची शक्यता आहे.जिथे स्थानिक औषधांची दुकाने औषधांचा मुख्य स्रोत आहेत.ई-फार्मसी प्लॅटफॉर्म प्रिस्क्रिप्शन औषधांच्या विक्रीमध्ये पुरेशी सुरक्षा आणि पडताळणी प्रक्रिया पाळत नाहीत,असे संघटनेचे म्हणणे आहे.या समस्येकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे.औषध विक्रेत्यांच्या मते,अनेक ई-कॉमर्स कंपन्या नियमांचे उल्लंघन करून थेट घरपोच औषध वितरण करत आहेत.या प्रक्रियेत रुग्णांच्या प्रिस्क्रिप्शनची किंवा औषधांच्या योग्य वापराची पुरेशी पडताळणी होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता(एआय)तंत्रज्ञानाच्या मदतीने डॉक्टरांच्या बनावट चिठ्ठ्या तयार करून नशा आणणारी किंवा घातक औषधे मागवली जात असल्याचा गंभीर मुद्दाही समोर आला आहे.या दिवशी खासगी मेडिकल स्टोअर्स बंद राहिल्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.सदरची बाब लक्षात घेता अन्न व औषध प्रशासनाने जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा सामान्य रुग्णालय, अधिष्ठाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये,जिल्हा आरोग्य अधिकारी,वैद्यकीय अधिकारी या सर्व प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील रुग्णालयांमध्ये २० मे पूर्वीच मुबलक औषधसाठा उपलब्ध करून ठेवावा असे पत्र पाठवले आहे.
औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप; औषधांची दुकाने राहणार बंद..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

