- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही वर्षांत सर्वत्र डिजिटल पेमेंट ही दैनंदिन सवय बनली आहे.दूध विक्रेत्यांपासून ते पेट्रोल पंप,भाजीवाले आणि मोठ्या शोरूमपर्यंत सर्वत्र युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआय(UPI)चा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे.मात्र,यूपीआय व्यवहारांवर मर्चेंट डिस्काउंट रेट(MDR)लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याने बँकांच्या या प्रस्तावित निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी ‘ऑल इंडिया मोबाइल रिटेलर्स असोसिएशन’ (एआयएमआरए)या व्यापारी संघटनेने येत्या,शुक्रवार २ ऑक्टोंबर रोजी देशभरात ‘नो यूपीआय डे’ पाळण्याचे मोठे आवाहन केले आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून २ ऑक्टोंबर रोजी राज्यभरासह देशभरातील मोबाईल विक्रेते आपला निषेध नोंदवतील.२ ऑक्टोंबर या दिवशी सहभागी मोबाईल दुकानदार यूपीआय द्वारे कोणतेही पेमेंट स्वीकारणार नाहीत.ग्राहकांना फक्त रोख म्हणजेच कॅश किंवा कार्डद्वारे व्यवहार करण्याचे आवाहन केले जाईल.विशेष म्हणजे,व्यापारी संघटनांचा विरोध डिजिटल पेमेंटला नसून यूपीआय वरील शुल्काला आहे.यूपीआय व्यवहारांसाठी सध्या असलेली झिरो मर्चेंट डिस्काउंट रेट व्यवस्था कायम ठेवावी,अशी त्यांची मागणी आहे.
येत्या,१५ ऑक्टोंबर २०२६ पासून २ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र ‘पर्सन टू मर्चंट’ व्यवहारांवर ०.४ टक्के एमडीआर लागू होणार आहे.समजा,१० हजार रुपयांच्या व्यवहारावर ४० रुपये लागतील.तर ७५ हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त व्यवहारावर कमाल ३०० रुपयेची मर्यादा असेल.मात्र,प्रत्येक यूपीआय व्यवहारावर शुल्क आकारले जाणार नाही.दोन हजार रुपयांपर्यंतच्या पात्र ‘पर्सन टू मर्चंट’ व्यवहारांना या शुल्कातून वगळण्यात आले आहे.तसेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होणारे ‘पर्सन टू मर्चंट’ व्यवहार शुल्कमुक्त राहणार आहेत.विशेषतः शुल्काचा अतिरिक्त आर्थिक भार सोसावा लागल्यास व्यापारी वर्ग मोठ्या व्यवहारांसाठी ग्राहकांकडून रोख रकमेचा हट्ट धरू शकतो.रोख व्यवहार वाढल्यास ग्राहकांना पुन्ह एटीएमच्या फेऱ्या मारणे,पैसे जवळ बाळगणे आणि सुट्या पैशांची व्यवस्था करणे अशा जुन्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
- Advertisement -

