Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीएका स्टॅम्प पेपरवर ३ टक्के कमिशन मिळूनही अतिरिक्त रकमेची वसुली..!

एका स्टॅम्प पेपरवर ३ टक्के कमिशन मिळूनही अतिरिक्त रकमेची वसुली..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-केवळ जिल्ह्यातच नाही,तर अख्ख्या महाराष्ट्रात शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरची खरेदी करतो म्हटले तर कुठे ११० रुपये तर कुठे १२० रुपये मोजावे लागतात.हुज्जत घालतो म्हटले तर तुम्हाला जिथून घ्यायचे आहे,तिथून १०० रुपयांत स्टॅम्प खरेदी करा, अशी अरेरावीची भाषा अनेक स्टॅम्प विक्रेते करतांना दिसून येतात.मुख्यत्वे प्रतिज्ञापत्र,भाडेकरार,संमती पत्र, नाव दुरुस्ती,वारसान फेरफार,नोटरी वा इतर कामांकरिता स्टॅम्प पेपरची आवश्यकता असते.अश्यातच शासनाने याचे मूल्य ठरवून दिलेले असतांनाही त्यापेक्षा जास्त रक्कम मोजावी लागत असल्याने अशा स्टॅम्प विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करावी,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.याबाबत कुणीही तक्रार करीत नसल्याने स्टॅम्प विक्रेते मर्जीने जास्त दर आकारून स्टॅम्प पेपरची विक्री करीत असल्याचे दिसून येते.त्यातच विद्यार्थ्यांपासून सर्वच घटकातील सामान्य माणसाचा मुद्रांकाशी(स्टॅम्प)संबंध येत असतो.डुप्लिकेट सर्टिफिकेट,गॅप सर्टिफिकेट, डोमिसाईल,राष्ट्रीयत्व,जातीचे प्रमाणपत्र,सौदा पावती, करारनामा,प्रतिज्ञापत्र, खरेदीखत,वाटणीपत्र आदी कारणांसाठी मुद्रांकाचा वापर होतो.मात्र,मूळ किंमतीपेक्षा अधिक दराने या मुद्रांकाची विक्री करून सामान्यांची अडवणूक केली जात आहे.मूळ किंमतीपेक्षा जास्त दराने मुद्रांक विक्री करू नये,असा नियम आहे.त्यानंतरही स्टॅम्प व्हेंडर(मुद्रांक विक्रेते) अतिरिक्त रक्कम आकारत असल्याचे सर्वश्रुत आहे. ग्राहकही झंझट नको म्हणून जादा रक्कम देतात.स्टॅम्प विक्रेत्यांना विक्रीवर ३ टक्के कमिशन मिळते.व्हेंडरला ठरलेले कमिशन मिळत असतांना जास्तीचे पैसे कशासाठी? हा गंभीर सवाल आहे.महिन्याला लाखो रुपयांचे स्टॅम्प एक व्हेंडर विकतो.त्यातून त्यांना चांगली कमाई होते.त्यामुळे त्यांनी जास्तीचे पैसे घेऊन ग्राहकांची पिळवणूक करू नये.अधिकाऱ्यांनी कॅबिनबाहेर निघून ग्राहकांची समस्या सोडवावी.स्टॅम्प पेपर जास्त दराने विकले जातात,अशी ग्राहकांची ओरड असूनही कारवाई मात्र शून्यच.त्यातच अधिकारी म्हणतात,लेखी तक्रार केल्यास नक्कीच कारवाई करू.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!