Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीउद्याला मतमोजणी; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचेकडून स्ट्राँग रूम व मतमोजणी व्यवस्थेचा आढावा..

उद्याला मतमोजणी; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचेकडून स्ट्राँग रूम व मतमोजणी व्यवस्थेचा आढावा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने उद्या,रविवार २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज,शनिवार २० डिसेंबरला कृषी महाविद्यालय गडचिरोली येथे उभारण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रासह मतदान यंत्रांच्या सुरक्षा कक्ष(स्ट्राँग रूम)व ईव्हीएम साठवणूक व्यवस्थेची पाहणी केली.
या पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी स्ट्राँग रूममधील प्रवेश-निर्गम व्यवस्था,सीसीटीव्ही निगराणी, सुरक्षारक्षकांची तैनाती,अग्निसुरक्षा उपाययोजना तसेच ईव्हीएम साठवणूक कक्षातील सुरक्षेच्या सर्व बाबींचा आढावा घेतला.मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणतीही त्रुटी उद्भवू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.यासोबतच कृषी महाविद्यालय परिसरातील बाह्य सुरक्षा व्यवस्था,वाहतूक नियंत्रण,प्रवेश नियंत्रण व मतमोजणीच्या दिवशी कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचीही त्यांनी तपासणी केली.मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि शांततेत पार पडावी यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.या पाहणीवेळी गडचिरोली नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता बेलपत्रे,मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांच्यासह पोलीस,महसूल व निवडणूक विभागातील अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!