Tuesday, July 14, 2026
Homeदेसाईगंजउद्याला कोंढाळा येथे एक दिवसीय धम्म प्रशिक्षण शिबिर…

उद्याला कोंढाळा येथे एक दिवसीय धम्म प्रशिक्षण शिबिर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज(गडचिरोली) :- बुध्दिस्ट पुरातत्व विरासत बचाव आंदोलन अंतर्गत उद्या दिनांक- २६ मे ला देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील मुख्य चौकातील राहुल बुध्द विहार याठिकाणी सकाळी १० वाजे पासून ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत एक दिवसीय धम्म प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आला आहे. सदर शिबिराचे विषय ‘भारतीय बौध्दांच्या समस्या – मी व माझी जबाबदारी’ असे आहे.प्रमुख मार्गदर्शक म्हणून भदंत सोमानंद (राष्ट्रीय प्रभारी BIN भिख्खू संघ) हे असणार असून शिबिरचे सुत्र संचालन भदंत सारिपुत्र (प्रभारी BIN भिख्खू संघ पूर्व विदर्भ विभाग) बंधु आणि भगिनि हे करणार आहेत.

ज्याप्रमाणे दुःख हे परस्परावलंबीत आहे; त्याचप्रमाणे सुख सुध्दा परस्परावलंबीत आहे.दुःखाला अधिक चिघळवण्यापेक्षा दुःख उत्पत्तीच्या कारणांचा शोध घेत राहणे व योग्य जाणीव प्राप्त करून त्या कारणांना रिमुव्ह(नष्ट) करीत राहावे.ही महाकारूणीक तथागत बुध्दाची शिकवण आपण सर्वांसाठी आहे.

असे असतांनाही बहुसंख्याक भारतीय बौध्द जीवनाच्या वाईट अवस्थेत आहेत.ही बाब अत्यंत वाईट आहे.यावर कोण? कुठे? केव्हा? कसा? चुका करीत आहेत.यापेक्षा मी कुठे कमी पडत आहे व माझी जबाबदारी काय? याच महत्वाच्या मुद्याचा विसर पडत आहे.

आपली संस्कृती शील सदाचार व विनय याला अनुसरून मानवी जिवनाच्या कल्याणकारी उदिष्टांना पूर्ण करणारी आहे.ही संस्कृती रूजवीत असतांना गहन चिंतन व जाणिवेची पाठबळ ठेवून स्वतःला अपडेट करत राहणे व दक्षतापुर्वक स्वतःप्रती, परिवाराप्रती,समाजाप्रती व राष्ट्रप्रती सांघीक दृष्टया कार्य करण्याची सवय स्वभाव निर्माण करण्याची गरज आहे.

मी सांगतो तेच योग्य… मेरीच सुनो… मेरीच गीनो… मेरे मुर्गे की एकच टॉग.. हा हट्टी, जिद्यी, अहंकारी स्वाभाव त्याग करून सामंजस्याची भावना ठेवून इतर पुढारीपणा गाजवणाऱ्या लहान-मोठ्या विविध संघटनेतील कार्यकर्त्यांशी मैत्रीपूर्वक संवाद साधून मुळ बुध्द, फुले व आंबेडकरी ध्येयांशी एकरूप करणे ही काळाची गरज आहे.बहुजन हिताय बहुजन सुखाय या सर्वोत्तम ध्येयाशिवाय दुसरे कोणते ध्येय्य आपल्याकरीता श्रेष्ठ असू शकते ?

आपल्या सर्वोत्तम ध्येय्या पेक्षा संगठन व पुढारी श्रेष्ठ नाहीत हे सगळे माध्यम असतात.आपल्याच बहुसंख्याक बांधवाना अज्ञान वंचीत गरीब, लाचार व गुलाम अवस्थेत बघून स्वताच्या पुढारीपणाचा किंवा व्यक्तिगत प्रगतीचा टेंभा मिरवत राहणे हे अकुशल कर्म आहे,याची जाणीव ठेवून वरील विषयांवर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर प्रशिक्षण शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बौध्द समाज बहुउद्देशीय सामाजिक मंडळ,आम्रपाली बौध्द महिला मंडळ,प्रशिक क्रीडा व युवा मंच,कोंढाळा यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!