Monday, May 18, 2026
Homeनागपूरउद्यापासून राज्यव्यापी जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संप - विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना,परिचारिका संघटनांचा सहभाग

उद्यापासून राज्यव्यापी जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संप – विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना,परिचारिका संघटनांचा सहभाग

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,महाराष्ट्र व्दारा संलग्न सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याच्या पूर्ततेकरीता १४ मार्च २०२३ ला राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.त्या संपात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना सक्रीय सहभागी होत आहे.

अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी,ही राज्यातील तमाम कर्मचारी वर्गांची मागणी आहे.त्याच बरोबर शिक्षक आणि शिक्षण विषयक अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत.जुनी पेंशन योजनाबाबत राज्यकर्ते वेळोवेळी वेगवेगळी विधाने करून कर्मचाऱ्यांत संभ्रम निर्माण करीत आहे.जुनी पेन्शन व इतर मागण्यांसाठी “विमाशी” नेहमीच रस्त्यावर उतरून आंदोलने करीत आहे.त्यामुळे समन्वय समितीने पुकारलेल्या संपात सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने घेतला आहे.या संपात सर्वांनी सहभागी होऊन संप यशस्वी करावा,असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार व्ही.यू.डायगव्हाणे,विमाशि संघाचे प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे,आमदार तथा सरकार्यवाह सुधाकर अडबाले आदींनी केले आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करावी व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना आपल्या ३४ शाखांसह,राज्य शासकीय,निम्शासकीय शिक्षक व सर्व विभाग कर्मचारी सोबत १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारणार आहे.राज्य सरकारने या मागण्यांबाबत कर्मचाऱ्यासोबत साधी चर्चासुद्धा केली नाही.संपाला १ दिवस उरलेला असताना सरकारने यावर काही तोडगा नाही काढला नाही.यासाठी संप पुकारला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वऱ्हाडांवर काळाचा घाला; ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात १३ जण ठार.

उद्रेक न्युज वृत्त :-साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांवर काळाने झडप घातल्याची घटना आज, सोमवार १८ मे रोजी दुपारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर घडली.ट्रक आणि कंटेनरच्या भीषण...

औषध विक्रेत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने देशभरातील ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या,बुधवार २० मे २०२६ रोजी संपूर्ण भारतभर...

येत्या गुरुवारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा; आपली मते,तक्रारी व संबंधित बाबी थेट समितीसमोर मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नागरिकांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा येत्या,गुरुवार २१ मे २०२६ रोजी सकाळी ११...

वाढत्या महागाईचा परिणाम; आता एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होत असतांना एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!