उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :-महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या मध्यवर्ती संघटनेने आपल्या हक्काच्या प्रलंबित मागण्यासाठी १८ डिसेंबर ते २० डिसेबर पर्यंत काम बंद आंदोलनाची हाक दिल्याने त्याला संलग्न असलेल्या देसाईगंज तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेनी तिन दिवस काम बंद आंदोलनात सहभागी होण्याचे ठरविले आहे.त्या अनुषंगाने त्यांनी नुकतेच संवर्ग विकास अधिकारी व विस्तार अधिकारी पंचायत समिती देसाईगंज यांना निवेदन सादर केले आहे.ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या बऱ्याच मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यामुळे या मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामपंचायत कर्मचारी हे आपल्या मध्यवर्ती संघटनेच्या हाकेला साथ देत १८ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ रोजी काम बंद आंदोलन करणार आहेत.सदर आंदोलनाला देसाईगंज तालुक्यातील ग्रामपंचायत कामगार सेनेने पाठिंबा देऊन सदर आंदोलनात सक्रिय सहभाग दर्शविला असून त्याबाबतचे निवेदन संवर्ग विकास अधिकारी व विस्तार अधिकारी पंचायत समिती देसाईगंज यांना दिले आहे.

