Thursday, August 27, 2026
Homeगडचिरोलीउद्यापासून कुष्ठरुग्ण शोध अभियान; संकोच न बाळगता तपासणी करण्याचे आवाहन..

उद्यापासून कुष्ठरुग्ण शोध अभियान; संकोच न बाळगता तपासणी करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आरोग्य विभागामार्फत शून्य कुष्ठरोग प्रसार २०२७ हे महत्वाकांक्षी लक्ष्य साध्य करण्यासाठी विशेष “कुष्ठरुग्ण शोध अभियान” उद्या,सोमवार १७ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२५ या कालावधीत  जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हास्तरीय समितीची बैठकीत पार पडली. यात कुष्ठरुग्ण शोध अभियान मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणेला निर्देश देण्यात आले.
तब्बल १४ दिवस चालणाऱ्या या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे जिल्ह्यातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण ओळखणे,त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे,तसेच संसर्गाची साखळी तोडून रोगाचा प्रसार थांबवणे हा आहे.हे अभियान जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागात तसेच शहरी भागातील जोखीमग्रस्त वस्त्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.या मोहिमेदरम्यान आशा स्वयंसेविका आणि पुरुष स्वयंसेवकांच्या पथकांमार्फत घरोघर भेट देऊन सर्वेक्षण केले जाईल.घरातील सर्व सदस्यांची कुष्ठरोगाबाबत शारीरिक तपासणी करण्यात येईल. त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टे,जाड झालेली त्वचा,कानाच्या पाळ्या जाड होणे,भुवया विरळ होणे, हात-पायांमध्ये बधिरता अशी संशयास्पद लक्षणे आढळल्यास संबंधिताची संशयित रुग्ण म्हणून नोंद केली जाईल.संशयित रुग्णांची वैद्यकीय अधिकारी सात दिवसांत तपासणी करतील.निदान निश्चित झाल्यानंतर ताबडतोब मोफत उपलब्ध असलेले बहुविध औषधोपचार सुरू केले जातील.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना आवाहन करतांना म्हटले की, “कुष्ठरोग पूर्णपणे बरा होणारा आहे.पथके घरोघरी तपासणीसाठी येतील, त्यांना संपूर्ण सहकार्य करावे.आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे.लवकर निदान म्हणजे लवकर उपचार आणि निरोगी जीवन.”
मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद सुहास गाडे यांनी सांगितले की, “अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी शिक्षण विभाग,ग्रामविकास,महिला व बाल कल्याण आदी विविध विभागांचा समन्वय साधण्यात आला आहे.समाजानेही सक्रिय सहभाग देऊन जिल्ह्याला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी हातभार लावावा.”
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी माहिती देतांना सांगितले, “या १४ दिवसांत आरोग्य पथके प्रत्येक घराला भेट देऊन सर्व सदस्यांची तपासणी करतील. कृपया योग्य माहिती द्यावी आणि कुष्ठरोगाची कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित कळवावे,जेणेकरून वेळेवर उपचार करता येतील.”
कुष्ठरोगावर लवकर निदान झाल्यास पूर्णपणे बरा होतो.उपचार मोफत उपलब्ध आहेत,त्यामुळे कोणताही संकोच न बाळगता तपासणी करून घ्यावी असे आवाहन सहाय्यक संचालक (कुष्ठरोग)डॉ. सचिन हेमके यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!