Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीउद्यापासून कर्करोग तपासणीसाठी ‘कॅन्सर व्हॅन आपल्या दारी' उपक्रम.. - मुख,स्तन आणि गर्भाशय...

उद्यापासून कर्करोग तपासणीसाठी ‘कॅन्सर व्हॅन आपल्या दारी’ उपक्रम.. – मुख,स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोगाची होणार प्राथमिक तपासणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यात कर्करोग तपासणी आणि जनजागृतीसाठी ‘वाहन आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित कॅन्सर व्हॅन मोहीम उद्या,शनिवार २२ नोव्हेंबर २०२५ ते ८ जानेवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे.या व्हॅनच्या माध्यमातून मुख,स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोगाची प्राथमिक तपासणी करण्यात येणार असून संशयित रुग्णांना पुढील निदानासाठी संदर्भित केले जाईल.
जिल्ह्यातील ३० वर्षांवरील महिला आणि पुरुषांनी या तपासणीचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ तोंड येणे, तोंडात पांढरे अथवा लाल चट्टे दिसणे,तोंड उघडताना त्रास होणे,तसेच महिलांमध्ये असामान्य रक्तस्त्राव,दुर्गंधीयुक्त स्त्राव,स्तनात गाठ किंवा आकारात बदल अशा लक्षणांची अनुभूती असल्यास तपासणी विशेषतः आवश्यक आहे.
कॅन्सर व्हॅन जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये नियोजित वेळापत्रकानुसार फिरणार आहे.गडचिरोली (२२ ते २७ नोव्हेंबर),चामोर्शी (२८ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर), मुलचेरा (१० ते १३ डिसेंबर), एटापल्ली (१५ ते १७ डिसेंबर), भामरागड (१८ ते २० डिसेंबर), अहेरी (२२ ते २४ डिसेंबर), सिरोंचा (२५ ते २७ डिसेंबर), धानोरा (२९ डिसेंबर ते १ जानेवारी), कोरची (२ आणि ८ जानेवारी) आणि कुरखेडा (३ ते ७ जानेवारी) या तालुक्यांमध्ये मोहीम राबविली जाणार आहे.
या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेता मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतिशकुमार सोलंके आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमित साळवे यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी कर्करोगाचा धोका लवकर ओळखण्यासाठी या मोहीमेत सक्रिय सहभाग नोंदवावा आणि कर्करोग तपासणी करून घ्यावी,असे आवाहन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!