- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-यंदा धान उत्पादक शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर शेतीमध्ये खरीप धान पिकाची लागवड केली. परंतु,तांत्रिक अडचणीमुळे सातबाऱ्यावर ई पीक पाहणीची नोंद न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.मागील काही वर्षांपासून शासनाने शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या धान पिकाची नोंदणी करण्यासाठी ‘ई पीक ॲप’ची सोय करून दिली आहे. त्यात शेतकऱ्यांनी केलेल्या धान पिकाची नोंद करण्याची सोय आहे.प्रत्यक्षात शेतावर जाऊन शेतकऱ्यांना नोंद घेऊन व फोटो घेऊन त्याची माहिती ॲपवर टाकावयाची असते.शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया केली; परंतु,तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांची ॲपवर नोंद झाली नाही.परिणामी,हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
सध्या आधारभूत धान केंद्रावर धान पिकाची खरेदी सुरू झाली आहे.परंतु,सात-बारावर धान पीक लागवडीची नोंद काही शेतकऱ्यांची न झाल्यामुळे खरेदी केंद्रावर धान खरेदी केली जात नसल्याची ओरड आहे.सोबतच सात बारावर धान पिकाची नोंद नसल्याने भविष्यात मिळणारा बोनस व इतर सवलतींचा लाभ मिळणे कठीण होण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांना लाभ मिळावा,याकरिता जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
- Advertisement -