Wednesday, September 2, 2026
Homeदेसाईगंजईव्हीएम हटाओ आंदोलन समितीचा ५ फेब्रुवारी रोजी देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा…-...

ईव्हीएम हटाओ आंदोलन समितीचा ५ फेब्रुवारी रोजी देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा…- ईव्हीएम हटाओ,संविधान बचाओ संदर्भात निवडणूक आयुक्तांना देणार निवेदन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-देशात २०१९ साली पार पाडण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीचे निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या आकडेवारीत प्रचंड अनियमितता आढळून आली असुन छत्तीसगड, राजस्थान व मध्यप्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही असाच घोळ निर्माण करण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांनी सबळ पुराव्यासह वास्तविकता चव्हाट्यावर आणली आहे.ही बाब लोकशाहीसाठी अतिशय घातक असुन यामुळे संविधान धोक्यात येण्याची दाट शक्यता लक्षात घेता ईव्हीएम हटाओ आंदोलन समितीचा ५ फेब्रुवारी २०२४ रोजी देसाईगंज उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा धडकणार असुन दरम्यान ईव्हीएम हटाओ देश बचाओ संदर्भात निवडणूक आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाने निष्पक्ष निवडणूक घेणे आवश्यक असताना व घेण्यात येत असलेल्या ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणूकांवर प्रश्न चिन्ह लावल्या जात असताना जिल्ह्याच्या गावागावात ईव्हीएम संदर्भात जनजागृतीच्या गाड्या फिरविण्यात येत आहेत.विशेष म्हणजे सदर गाड्यांवर लावलेल्या बॅनरवर ईव्हीएमची विश्वासार्हता सांगितली जात असुन त्याचसोबत मोदी गॅरन्टी असल्याचे सांगीतले जात आहे.मा.नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असुन ते सर्वांचे पंतप्रधान आहेत.असे असले तरी निवडणूका घेण्याचा अधिकार त्यांना नसुन तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे.निवडणूक आयोग हे स्थिर संवैधानिक संस्था असुन देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूका व्हाव्यात; यासाठी भारतीय राज्यघटनेने कायमस्वरुपी आणि स्वतंत्र संस्थेची स्थापना केली आहे.मात्र असे असताना व विकसित देशांनी देखील निवडणूका ईव्हीएम प्रभावित करु शकतात म्हणून वापर बंद केला आहे.सरकार कोणाचेही येवो मात्र निवडणूका निष्पक्ष होणे आवश्यक आहे.

घेण्यात येत असलेल्या निवडणुकांता ईव्हीएमचा वापर करण्यात येत असल्याने आपले मत कुणाला देतो याबाबत संशय आहे.ईव्हीएम मशिनला जोडल्या गेलेली व्हिव्हिपॅट मशिन ७ सेकंद पर्यंत दिलेल्या मताचे चिन्ह दाखवित असले तरी व्हिव्हिपॅट  मधून दिसणाऱ्या मतपत्रिकेची संशयास्पद स्थितीत मतमोजणी केली जात नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व्हिव्हिपॅटच्या मतपत्रिका एक वर्षांपर्यंत सुरक्षित ठेवणे आवश्यक असताना व संशयास्पद स्थितीत मतपत्रिकेचीच मोजणी करणे अनिवार्य असताना तसे केले जात नाही. यावरून लोकाधिकार संपुष्टात येऊन एकाधिकारशाही निर्माण झाल्यास संविधानाने दिलेले अधिकार संपुष्टात येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.करीता निवडणूका निष्पक्ष घेण्यासाठी ईव्हीएम हटाओ,देश बचाओ अंतग॔त समितीच्या वतिने देसाईगंज येथील फव्वारा चौकापासून जनआक्रोश मोर्चाची सुरुवात करुन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवडणूक आयुक्तांना येत्या सर्व निवडणूका बॅलेट पेपरनेच घेण्या संदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती आंदोलन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.आयोजित मोर्चात जास्तीत जास्त संख्येनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!