Friday, September 4, 2026
Homeगोंदियाइसापूर (इटखेडा) येथील हत्याकांडाचा पोलिसांनी लावला छडा…-पत्नी आणि प्रियकराने मिळून केली हत्या…

इसापूर (इटखेडा) येथील हत्याकांडाचा पोलिसांनी लावला छडा…-पत्नी आणि प्रियकराने मिळून केली हत्या…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- अर्जुनी-मोरगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या इसापूर (इटखेडा) येथील मेघश्याम कुंडलिक भावे वय ४२ वर्षे यांची आंघोळ घालत असताना गळ्यावर गळा दाबल्याची खूण आढळून आल्याने हत्येचा उलगडा झाला.याप्रकरणी मृतकाची पत्नी आणि आरोपी पत्नीच्या बहिणीच्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

प्राप्त माहितीनुसार,मुलगा,पती,बहिणीची मुलगी यांच्यासोबत रात्री जेवण करून झोपी गेले.त्यानंतर डाव साधून महिलेने आपल्या पतीचा नायलॉनच्या दोरीने गळा घोटून त्याची हत्या केली.मात्र सकाळी नैसर्गिक मृत्यूचा बनाव केला.अंत्ययात्रेत आलेल्या नातलगांच्या ही बाब लक्षात येताच संशय घेवून पोलिसांची मदत मागितली.त्यानंतर पत्नीच्या कृत्याचा भांडाफोड झाला.अखेर पोलिसांनी त्या निर्दयी पत्नी वैशाली मेघश्याम भावे वय ३२ वर्षे रा.इसापूर हिला बेड्या ठोकल्या असून दुसरा आरोपी तिचा प्रियकर तेजेराव भुजंग गादगे वय २२ रा.बिलोली,जि.नांदेड याला अटक करण्यात आली.त्यानंतर दोन्ही आरोपींना दिवाणी न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना मंगळवारपर्यंत दि.१८ जून पर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

आरोपी वैशाली भावे हिचे इंस्टाग्रामवर तेजराव भुजंग गादगे याच्यासोबत दोन वर्षांपासून ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेम व मैत्रीत झाले. तेजेराव हा अधूनमधून वैशालीला भेटण्यासाठी इसापूर येथे यायचा. तो पिकअप चालक आहे. मृतकाच्या पत्नीला सासू-सासरे व पतीसोबत राहायचे नव्हते तर तिला वेगळे राहायचे होते.मंगळवारी दि.११  जूनला घटनेच्या दिवशी तिने बोलावल्याने आरोपी प्रियकर सकाळी इसापूरला आला.दरम्यान तिने रात्री घरामागचा दरवाजा उघडा ठेवला होता.अशात तो रात्री मृतकाच्या घरी गेला.रात्री अंदाजे १२ वाजताच्या सुमारास दोघांनीही गळा आवळून मेघश्याम भावेचा खून केला.हत्येचा कट रचून मारण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.त्यानंतर तो रात्री तिथून निघून गेला.गोपनीय माहितीच्या आधारे अर्जुनी मोरगाव पोलिसांना तो पुसद येथे असल्याचे आढळून आले.लगेच अर्जुनी मोरगाव पोलिसांनी पुसद पोलिसांना कळवून प्रियकर आरोपीला ताब्यात घ्यायला लावले. त्यानंतर अर्जुनी मोरगावचे पोलिस पथक पुसदला रवाना करून आरोपीला बारा तासांत ताब्यात घेत अर्जुनी मोरगावला आणले.त्याच्यावर गुन्हा दाखल करून पाच दिवसांची पोलिस कोठडी मागण्यात आली.दोन्ही आरोपीवर कलम ३०२,१२० (ब) भादंवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, साहाय्यक पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील अधिक तपास करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!