उद्रेक न्युज वृत्त :- आपण कधी ऐकले नसेल अशी एक गाय तिची किंमत ९ कोटींच्या वर असून ती दररोज ५० लिटर दूध द्यायची.सदर गायीचे नाव मिस्सी असून हॉल्स्टीन प्रजातीची गाय जगातील सर्वात महाग म्हणून तिची आजवरची ख्याती आहे. सन २००९ मध्ये ९ कोटी रुपयांत कॅनडातील लिलावा प्रक्रिये दरम्यान डेन्मार्कच्या ग्राहकाने तिची खरेदी केली होती.
सदर गायीच्या मालकाने कधीही स्वप्नात बघितले नव्हते की एवढ्या मोठ्या रकमेत गायीची विक्री होणार आहे.मात्र गायीला खरेदी केलेल्या ग्राहकाने केवळ दिवसागणिक ५० लिटर दूध देते म्हणून ९ कोटी रुपये मोजलेले नव्हते.तर गायी मधील काही विशिष्ट आनुवंशिक गुण असल्याने त्या माध्यमातुन जनुकांचा वापर करून आणखी प्रजाती तयार करण्यात येणार असल्याने एवढी मोठी किंमत खरेदी दाराने मोजली होती.
.