Thursday, June 25, 2026
Homeनागपूरआयएसआयच्या हस्तकासोबत गोपनीय माहिती उघड केल्या प्रकरणी एकास जन्मठेप…

आयएसआयच्या हस्तकासोबत गोपनीय माहिती उघड केल्या प्रकरणी एकास जन्मठेप…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- ब्रह्मोस क्षेपणास्त्राची गोपनीय माहिती पाकिस्तानातील आयएसआयच्या हस्तकासोबत उघड केल्याच्या आरोपात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने वैज्ञानिक निशांत प्रदीप अग्रवाल (वय ३२, रा. नेहरूनगर, रुडकी, जि. हरिद्वार, उत्तराखंड) याला दोषी ठरविले आहे.माहिती तंत्रज्ञान आतंकवाद व शासकीय गुपित कायद्यानुसार त्याला सश्रम जन्मठेप,तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.या कायद्यानुसार झालेली नागपूरमधील ही पहिलीच शिक्षा मानली जात आहे.

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी हा निर्णय दिला.२०१८ मध्ये त्याला उत्तरप्रदेश दहशतवादविरोधी पथक (एटीएस) व लष्करी गुप्तचर संस्थेच्या (एमआय) पथकाने अटक केली होती. त्यावेळी ब्रह्मोस एरोस्पेसच्या, नागपूर युनिटमध्ये २०१४ पासून निशांत सीनियर सिस्टिम इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. उज्ज्वलनगर येथे भाड्याच्या घरात त्याचे वास्तव्य होते.

याच दरम्यान नेहा शर्मा व पूजा रंजन या नावाने त्याला फेसबुक रिक्वेस्ट आल्या आणि तो हनीट्रॅपमध्ये अडकला. तसेच, सोशल मीडिया अकाऊंटवरून आलेल्या नोकरी विषयक लिंक ओपन केल्याने त्याच्या वैयक्तिक लॅपटॉपमध्ये मालवेअर (व्हायरस) शिरला. याच आधारे सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेत्रणास्त्रांची संवेदनशील गोपनीय माहिती पाकची गुप्तहेर संस्था आयएसआयपर्यंत पोहोचली, असा संशय एटीएसला होता.

८ ऑक्टोबरला २०१८ रोजी पहाटे एटीएसच्या पथकाने नागपुरात धडक दिली. निशांत काम करीत असलेल्या ब्रह्मोस एअरोस्पेस प्रकल्प व त्याच्या निवासस्थानी छापा टाकला होता. निशांतला अटक करून लखनऊला नेण्यात आले होते. त्याच्याकडून लॅपटॉप, टॅब आणि मोबाईलसह काही पेन ड्राईव्हही जप्त करण्यात आले होते. पाकिस्तानी हेर नागपुरात पकडल्याच्या वृत्ताने देशभर खळबळ उडाली होती.

पाच महिने भारतीय सुरक्षा यंत्रणांमधील वेगवेगळ्या तपास पथकांनी त्याची चौकशी केली. त्यानंतर, अचानक १४ मार्च २०१९ रोजी यूपी एटीएसने प्रचंड सुरक्षा व्यवस्थेत नागपुरात आणले होते. तेव्हापासून तो मध्यवर्ती कारागृहात होता. मागील वर्षी त्याची जामिनावर सुटका झाली होती.खटल्यामध्ये दोषी आढळल्याने न्यायालयाने त्याला जन्मठेप सुनावली. त्याला नागपूर एटीएसमार्फत लखनऊला नेण्यात येणार आहे. शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ज्योती वजानी यांनी बाजू मांडली.

ब्रह्मोसची वैशिष्ट्ये👇

* ब्रह्मोस हे भारत आणि रशियाच्या संयुक्त संशोधनातून तयार झालेले क्षेपणास्त्र आहे.

* कमी अंतरापर्यंत वार करणारे हे क्षेपणास्त्र जमीन, विमान, जहाज आणि पाणबुडीत वापरले जाते.

* हवेतच मार्ग बदलण्याची क्षमता.

* अवघ्या १० मीटरच्या उंचीवरून उडण्याची क्षमता.

उत्तरप्रदेश एटीएसने निशांतला अटक करण्याच्या काही महिन्यांपूर्वी आयएसआय एजंटाला ताब्यात घेतले होते.त्याच्या चौकशीतून निशांत अग्रवालचे नाव समोर आले.मिलिटरी इंटेलिजन्सला याबाबतची माहिती देण्यात आली. यानंतर यूपी एटीएस व मिलिटरी इंटेलिजन्सच्या पथकांनी त्याची माहिती जमवणे सुरू केले होते. निशांत हा फेसबुकवर पाकच्या महिला मित्रांसोबत डीआरडीओची माहिती शेअर करीत असल्याचा संशय होता.

निशांत कुरुक्षेत्रच्या एनआयटीचा पासआऊट आहे.तो ब्रह्मोस मिसाइल युनिटच्या हायड्रॉलिक-न्यूमॅटिक्स आणि वॉरहेड इंटिग्रेशन विभागाच्या ४० लोकांच्या चमूचे नेतृत्व करत होता. २०१७-१८ मध्ये युनिटने त्याला युवा वैज्ञानिक पुरस्कारानेही गौरविले होते. ब्रह्मोसच्या सीएसआर, संशोधन आणि विकास (आरअँडडी) ग्रुपचाही तो सदस्य होता. घटनेच्या वेळी ब्रह्मोस नागपूर व पिलानी साइट्सचे प्रोजेक्ट्स पाहात होता.परंतु, ऑक्टोबर २०१८ मध्ये त्याला अटक झाली.तर, घटनेच्या सात महिने आधी मार्च २०१८ मध्येच त्याचे लग्न झाले होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!