उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- आमरण उपोषणकर्ते सत्यवान रामटेके यांची प्रकृती ७ ऑक्टोंबर २०२३ रोजी बरी नसल्याने ते जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दोन दिवसांपासून सलाईनवर होते.मात्र आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने ते परत उपोषणस्थळी येऊन त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
अगदी साध्या,सरळ व सोप्या आमरण उपोषणकर्ते सत्यवान रामटेके यांच्या मागण्या असूनही गडचिरोलीचे विभागीय वन अधिकारी गणेशराव झोळे हे विषयाचे विषयांतर करून व टाळाटाळ करून दिवसेंदिवस उपोषण वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.मात्र आमरण उपोषणकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने पुढील काळात काय घडणार याकडे सर्वसामान्य जनतेच्या नजरा भिडल्या आहेत.