Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीआमदार रामदास मसरामांकडून अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश.....

आमदार रामदास मसरामांकडून अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश.. – जिल्हाधिकाऱ्यांशी थेट साधला संवाद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून ऊन आणि पावसाचा खेळ सुरूच आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे.एकीकडे सतत पडणाऱ्या अवकाळी  पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.हातातोंडाशी आलेले धान पिक निसर्गाने हिरावून घेतल्याने काय करावे? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात घर करून सोडत आहे. पावसामुळे शेतपिकांसह घरांचेही मोठे नुकसान झाले आहे.अशातच जिल्ह्यातील अनेक भागात उभी पिके आडवी झालीत तर काही ठिकाणी संपूर्ण शेती उध्वस्त झाली आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त होऊन आर्थिक विवंचनेत सापडला असल्याने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी जिल्हा प्रशासनासह महसूल विभाग व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.त्याचप्रमाणे पंचनामे करतांना पारदर्शकता व गती राखण्याचेही निर्देश दिले असून यासंदर्भात थेट गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याशी संवाद साधून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळावी,यासाठी साकडे घातले.
ऐन पिके निघून कापणी सुरू असतांनाच अवकाळीने झोडपले आहे.अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पावसात भिजून हातची गेली आहेत.विशेषतः कर्ज घेऊन पीक लावणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या पावसामुळे पिकांच्या उत्पादनात घट झाली असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर झाला आहे.प्रसंगी आमदार मसराम म्हणाले की, शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. त्यांनी धीर सोडू नये.आम्ही शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून योग्य त्या नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करत आहोत.पंचनाम्याचे काम तातडीने पूर्ण होऊन अहवाल शासनाला सादर केला जाईल.गडचिरोलीसह विदर्भातील अनेक भागांमध्ये दरवर्षी अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे.त्यामुळे दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची मागणीही आमदार मसराम यांचेकडून होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!