Friday, August 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता शेतकऱ्यांना आधारकार्डप्रमाणेच मिळणार 'फार्मर आयडी'...

आता शेतकऱ्यांना आधारकार्डप्रमाणेच मिळणार ‘फार्मर आयडी’…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्यांना आधारकार्डप्रमाणेच एक युनिट आयडी नंबर देण्यात येणार आहे.हा युनिक आयडी देऊन सरकार शेतकऱ्यांची माहिती एकत्र करणार आहे.जर तुमच्या नावावर जमीन असेल तरच तुम्हाला ‘फार्मर आयडी’ मिळणार आहे.शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी,गावाचे नकाशे यांच्या नोंदी डिजिटल केली जाणार आहेत.
ज्यामुळे शेतकऱ्यांना सेवा आणि सुविधा मिळू शकतील.सोबतच शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे.त्यातून पीक संरक्षण,जमिनीचे आरोग्य,हवामान अंदाज,भूजल पातळी यांसारखी महत्त्वाची माहिती एकत्रित करून त्यावर आधारित सपोर्ट सिस्टिम उभारण्यात येणार आहे.म्हणजेच पाऊस किती पडणार? यासारखीही माहिती आता शेतकऱ्यांना मिळेल.सध्या शेतकऱ्यांना कृषी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी प्रत्येकवेळी पडताळणी करावी लागते.त्यात खर्चही होतो.तसेच शेतकऱ्यांना संबंधित कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात.कधी कागदपत्र वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. शेती क्षेत्रात डिजिटल सिस्टिम तयार झाल्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या जमिनीचा रेकॉर्ड त्यासोबत जोडला जाणार असून शेतकऱ्यांबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी सरकारला उपयोगी होणार आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रात डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणून प्रत्येक शेतकऱ्यांना युनिट आयडी देण्याचा संकल्प केला आहे.
शेतकऱ्यांना फार्मर आयडी अनेक कामासाठी उपयुक्त ठरणार असून त्यांचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे.
शेतकऱ्यांना आधारकार्डसारखे स्वतःचे ओळखपत्र वाटप करण्यात येणार आहे.यासाठी महसूल विभागाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हे काम करण्यात आले आहे.तर येत्या मार्चमध्ये संपणार आहे. शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारची पेरणी करायची? बी-बियाणे कोणते वापरायचे? कधी लागवड करायची? कापणी कधी करायची?याबाबतचे मार्गदर्शनही केले जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

किरण चौधरी “मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कारा”ने सन्मानित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दैनिक देशोन्नती "मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कार" व दैनिक देशोन्नतीच्या ‘मनस्विनी’ सदरातून आपल्या लेखणीची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या गडचिरोलीतील किरण महादेव चौधरी यांच्या ‘लेखमंजिरी’...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!