Tuesday, May 26, 2026
Homeपुणेआता शेतकरी बांधवांच्या जमिनी राज्य सरकार घेणार भाड्याने - फडणवीसांनी केला मोठा खुलासा

आता शेतकरी बांधवांच्या जमिनी राज्य सरकार घेणार भाड्याने – फडणवीसांनी केला मोठा खुलासा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

पुणे :- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी असून सौरउर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी वापरल्या जातील.जमिनीच्या बदल्यात शेतकऱ्यांना मोबादला दिला जाणार आहे.तसेच शेतकऱ्यांना वर्षाला हेक्टरी ७५ हजार रुपये देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी पाउंडेशनच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.त्यावेळी ते बोलत होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पाणी फाउंडेशनची गट शेती व्यवस्था पाहून गट शेती करण्यासाठी काहीतरी नवी योजना तयार करणे गरजेचे वाटते.शेतकरी दिवसा वीज पुरवठा सुरू ठेवण्याची मागणी आता करतांना दिसत आहे’.

आता शेतकऱ्यांना दिवसाला बारा तास वीज पुरवठा करण्यासाठी आता वीज पुरवठा करणारे फिडर सोलरवर करण्याचे काम हाती घेत आहोत.शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणारे ३० % फिडर आपण आता सोलारवर केले आहेत,असे ते म्हणाले.

सरकारी जमीनीसह शेतीमध्ये फारसे काही पीकत नसले तर ती शेती ३० वर्ष भाड्याने घ्यायला राज्य सरकार तयार आहे.नापीक असलेल्या भागातील शेतकऱ्यांची जमीन सौरउर्जा प्रकल्पासाठी करार पद्धतीने भाड्याने घ्यायला तयार आहोत.त्यासाठी वर्षाला ७५ हजार रुपये देणार, त्यावर दर दोन वर्षांला दोन टक्के दर वाढ देणार,असेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान,यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. नमो शेतकरी योजना सुरू केली.केंद्रासह राज्य सरकारदेखील शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये टाकणार आहे.विम्याच्या हप्ता भरण्याची आवश्यकात नाही.जवळपास दीडलाख शेतकऱ्यांना शेततळे दिल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!