Tuesday, September 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता 'शिवभोजन थाळी' योजनाही बंद होण्याच्या मार्गावर..

आता ‘शिवभोजन थाळी’ योजनाही बंद होण्याच्या मार्गावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गोर गरिबांना सणावारांना मिळणारा ‘आनंदाचा शिधा’ सरकारच्या यादीतून बाद झाला असतांनाच पुढील नंबर तोही गोर गरिबांच्या शिवभोजन थाळीवर लागणार की काय?अशी निदर्शनास येऊ लागले आहे.शासन योजना सुरू करते खरी,पण पैश्याचा ठणठणाट अभावी सुरू केलेल्या योजनांवर कात्री लावली जाते.शिवभोजन थाळी दहा रुपयांत मिळते.दहा रुपयाच्या जेवणात गोरगरीब जनतेला दोन पोळ्या,एक वाटी भात,एक वाटी वरण व एक वाटी भाजी दिली जाते. राज्य शासन शिवभोजन केंद्र चालकांना शहरी भागात प्रति थाळी ५० रुपये तर ग्रामीण भागात ३५ रुपयांचे अनुदान देते.त्यानुसार राज्याच्या विविध जिल्ह्यात शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली असून गडचिरोली-१४,गोंदीया-१०,चंद्रपुर-२२,नागपूर-३४, पुणे-९७, अमरावती-२३,औरंगाबाद-१८,बीड-२४, बुलढाणा-१७,धुळे-१५,अहमदनगर-२९,अकोला-१३, हिंगोली-९,जळगाव-३८,जालना-१५,कोल्हापूर-३७, लातूर-२०,नांदेड-२२,नंदूरबार-१३,नाशिक-४५, उस्मानाबाद-१२,पालघर-१३ व परभणी-१२,असे एकूण राज्यात १ हजार ९०४ शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. केंद्रनिहाय थाळीची मर्यादा देण्यात आली असून दर महिन्याला अनुदान दिले जाते.मात्र,ही योजनाच आता आर्थिक अडचणीत आली आहे.गेल्या वर्षभरापासून या योजनेचे अनुदान रखडण्यास सुरुवात झाली आहे. प्रारंभी महिन्याचे अनुदान रखडत होते,नंतर ते दोन महिन्याचे रखडत गेले.सध्या राज्यात एप्रिल ते जुलै अशा चार महिन्यांचे अनुदान रखडले आहे.राज्य शासन ही योजना बंद होणार नाही,असे म्हणत असले तरी वेळेत अनुदान मिळत नसल्याने काहींनी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे स्वस्त दरात पोटभर जेवण देणारी ‘शिवभोजन थाळी’ ही योजनाही बंद होण्याच्या मार्गावर आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!