Thursday, September 17, 2026
Homeगडचिरोलीआता विदर्भातील हत्तींची तयार होणार स्वतंत्र ओळख नोंदवही.. - वन विभागाच्या सहकार्याने...

आता विदर्भातील हत्तींची तयार होणार स्वतंत्र ओळख नोंदवही.. – वन विभागाच्या सहकार्याने हत्तींच्या हालचालींवर राहणार वैज्ञानिक पद्धतीने नजर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यात वन्यजीव व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील हत्तींच्या हालचालींचे शास्त्रीय पद्धतीने निरीक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या वावरासंबंधी अचूक माहिती संकलित करण्यासाठी विशेष उपक्रमाला गती देण्यात आली आहे.या अनुषंगाने महाराष्ट्र वन विभागाने ‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट्स’ या संस्थेला गडचिरोली जिल्ह्यात हत्तींच्या हालचालींच्या निरीक्षणासाठी आणि संबंधित कार्यासाठी एक वर्षाची परवानगी प्रदान केली आहे.
प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव)तथा मुख्य वन्यजीव संरक्षक,महाराष्ट्र राज्य यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ही संस्था वन विभागाच्या समन्वयाने हत्तींच्या हालचालींची नोंद,दस्तावेजीकरण,भ्रमण मार्गांचे विश्लेषण तसेच क्षेत्रीय माहिती संकलनाचे कार्य करणार आहे.हत्तींच्या कळपांच्या हालचालींचे नियमित निरीक्षण करून त्यासंबंधीची माहिती वन विभागाला उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत विदर्भातील हत्तींची स्वतंत्र ओळख नोंदवही तयार करण्यात येणार असून त्यामध्ये हत्तींची छायाचित्रे,कळपांची रचना,वय-लिंग वर्गीकरण आणि वर्तनविषयक नोंदींचा समावेश असेल.यामुळे हत्तींच्या हालचालींचा अधिक अचूक अभ्यास करण्यास मदत होणार आहे.
जीआयएस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हत्तींच्या भ्रमण मार्गांचे नकाशे तयार करणे,विश्रांती स्थळे,रस्ते ओलांडण्याची ठिकाणे तसेच संभाव्य संघर्ष क्षेत्रांची ओळख पटविणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. याशिवाय गावनिहाय घटनांची नोंद करून हत्तींच्या वावरासंबंधी माहितीचे विश्लेषण करण्यात येणार आहे.
स्थानिक नागरिकांना हत्तींच्या हालचालींबाबत वेळेवर माहिती मिळावी यासाठी जनजागृती कार्यक्रम, गावस्तरीय बैठका आणि माहिती प्रसाराचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.शाळांसाठी माहितीपर साहित्य तयार करण्यासोबतच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी,स्वयंसेवक आणि स्थानिक समुदायासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे.
या प्रकल्पांतर्गत तिमाही प्रगती अहवाल,तांत्रिक नोंदी, नकाशे आणि क्षेत्रीय अभ्यास अहवाल वन विभागाकडे सादर करण्यात येणार असून त्याच्या आधारे भविष्यातील नियोजन आणि व्यवस्थापन अधिक परिणामकारकपणे करता येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात वाढत असलेल्या हत्तींच्या वावराच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेला हा उपक्रम वन विभागाला हत्तींच्या हालचालींबाबत अचूक आणि अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यास मदत करणार असून वन्यजीव व्यवस्थापन अधिक वैज्ञानिक आणि प्रभावी करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा सफल; मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे..

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू केलेल्या उपोषणाची सांगता तब्बल २० व्या दिवशी संपुष्टात आल्याने...

आदर्श प्राचार्य पुरस्कार प्राप्त डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांचा कुरखेडा शहर विचार मंचाच्या वतीने गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘डॉ.जे.पी.नाईक आदर्श प्राचार्य’ पुरस्कार प्राप्त करून श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांनी गडचिरोली...

पोलीस हवालदार अडकला एसीबीच्या जाळ्यात; पोलिस ठाण्याच्या आवारातच सापळा कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका पोलीस हवालदारास तब्बल ४० हजाराची लाच घेतांना नागपूरच्या एसीबी पथकाने पोलिस ठाण्याच्या आवारातच रंगेहाथ पकडले.सचिन तायडे असे लाचखोर पोलिस हवालदाराचे...

दुपारीच स्टेटमेंट दिला अन् सायंकाळीच निलंबनाचा आदेश धडकला.. – गडचिरोलीच्या जिल्हा शल्य चिकित्सक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पर्यवेक्षकीय जबाबदारीत अक्षम्य निष्काळजीपणा व दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा शिवाजी लहाडे यांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!