- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता बहिणींची झडती सुरू व्हायला लागल्याचे दिसून येत आहे.सुरुवातीला सरसकट महिलांना १५०० रुपये खात्यात जमा करण्यात आले व नंतर काही कालावधीतच लाखो लाडक्या बहिणी अपात्र ठरविण्यात आल्या.अशातच आता सरकारने पुन्हा एकदा योजनेत बदल केला आहे.आता लाडकी बहीण योजनेतील ८ लाख महिलांना १५०० रुपयांऐवजी केवळ ५०० रुपये मिळणार आहेत.तर १५०० रुपये केवळ अश्या महिलांना मिळणार आहेत,ज्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाहीत.
‘या’ महिलांना मिळणार केवळ ५०० रुपये👇
“नमो किसान सन्मान निधी” चा लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त ५०० रुपये मिळतील.नमो किसान सन्मान योजनेअंतर्गत,राज्य सरकार ६ हजार रुपये आणि केंद्र सरकार ६ हजार रुपये देते.अशा प्रकारे एकूण १२ हजार वार्षिक,तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत १८ हजार दिले जातात.त्यामुळे,किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना उर्वरित फक्त वार्षिक ६ हजार रुपये आणि दरमहा ५०० रुपये फरक म्हणून मिळतील.त्यामुळे अश्या महिला शेतकऱ्यांना आता केवळ ५०० रुपयांवरच समाधान मानावे लागणार आहे.
- Advertisement -