- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-ग्रामीण भागातील मजुरांना गावातच रोजगार मिळावा,यासाठी ‘रोजगार हमी योजना कायदा २००५’ अंतर्गत रोजगाराची हमी देत विविध अकुशल कामांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिल्या जात आहे.अशातच मागील वित्तीय वर्ष २०२४-२५ मध्ये मजुरांना २९७ रुपये मजुरी होती.तर आता १ एप्रिल २०२५ पासून मजुरांच्या मजुरीत वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार आता मजुरांना ३१२ रुपये प्रतिदिन मजुरी मिळणार आहे.यंदा केवळ १५ रुपये मजुरीत वाढ करण्यात आली आहे.
दरवर्षी केंद्र सरकार आर्थिक वर्षाच्या १ एप्रिल पासून रोजगार हमी योजनेच्या मजुरीत वाढ करीत असते. मजुरीत वाढ तर होते,मात्र केवळ तुटपुंज्या स्वरूपात वाढ करण्यात येत असल्याने सरकार श्रमिक बांधवांची थट्टा तर करीत नाही ना..! असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.शासनाच्या कर्मचाऱ्यांचे भत्ते महागाईच्या तुलनेत सातत्याने वाढत असतांना, ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेअंतर्गत श्रम करणाऱ्या मजुरांच्या रोजंदारीत मात्र अत्यंत तुटपुंजी वाढ करण्यात आली आहे.शासनाची ग्रामीण भागातील श्रमिकांप्रती असलेली असंवेदनशीलता या निर्णयातून स्पष्टपणे दिसून येत आहे.अशातच हरियाणा राज्यात रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांना ४०० रुपये मजुरी अदा केली जाते.हे विशेष.
- Advertisement -