Wednesday, August 5, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता रुग्णालयातून सुट्टी मिळण्यापूर्वीच नवजात बालकाच्या पालकांना मिळणार जन्म दाखला..

आता रुग्णालयातून सुट्टी मिळण्यापूर्वीच नवजात बालकाच्या पालकांना मिळणार जन्म दाखला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-सध्याच्या घडीला जन्म दाखला (जन्म प्रमाणपत्र)नागरिकांच्या ओळखीचा आणि अधिकारांचा एकमेव आधार बनला आहे.शासकीय  नोकरी पासून ते शाळा,महाविद्यालयीन प्रवेश, पासपोर्ट,विवाह नोंदणी यासारख्या सर्व प्रक्रियांमध्ये जन्म दाखला एक अतिआवश्यक दस्तऐवज बनला आहे.१ ऑक्टोंबर २०२३ पासून लागू झालेल्या नवीन नियमानुसार,जन्म दाखला आता मूळ जन्मतारखेचा एकमेव पुरावा मानला जातो आहे.त्यामुळे देशभरातील जन्म दाखल्याबाबत मोठा बदल करण्यात आला आहे.आता नवजात बालकाच्या पालकांना बाळाच्या जन्मानंतर दाखल्यासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज)देण्यापूर्वी नवजात बालकाचा जन्म दाखला कुटुंबाला उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.नागरिकांच्या सोयी वाढविण्यासाठी आणि सरकारी प्रक्रिया सोप्या आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.भारतीय रजिस्ट्रार जनरल (आरजीआय) कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार देशातील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयांना बाळाच्या जन्मानंतर लगेच नोंदणी करावी लागेल आणि डिस्चार्ज देण्यापूर्वी त्याचे जन्म दाखला(प्रमाणपत्र) कुटुंबाला सुपूर्द करावे लागेल.हा आदेश विशेषतः पन्नास टक्के पेक्षा जास्त संस्थात्मक जन्म हाताळणाऱ्या रुग्णालयांवर लक्ष केंद्रित करून लागू करण्यात आला आहे.जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा (आरबीडी)१९६९ अंतर्गत नवजात बालकाच्या जन्माची नोंदणी केली जाते.२०२३ मध्ये,हा कायदा अधिक प्रभावी करण्यासाठी त्यात सुधारणा करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात...

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!