- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील परिस्थितीच्या आधारे राज्यातील सुमारे २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करुन विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता आणखी १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या तीव्रतेची पडताळणी केली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या ट्रिगर-१ यादीतील तालुकांव्यतरिक्त १८ तालुक्यांमध्ये देखील दुष्काळाची तीव्रता असून सदर तालुक्यातील प्रमुख ५ पिकांच्या २० टक्के सर्व्हेक्षण करून वस्तुस्थिती तपासण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.विशेष म्हणजे,दुष्काळ जाहीर करण्यासाठी सर्व्हेक्षण अहवाल महत्वाचा असतो.त्यानुसार,खालील १८ तालुक्यांत सर्वप्रथम सर्व्हेक्षण करून दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे.
- छत्रपती संभाजीनगर महसूल विभाग👇
नांदेड जिल्हा :- मुदखेडा व मुखेड तालुका
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- नागपूर महसूल विभाग👇
चंद्रपूर :- जिवती,ब्रम्हपूरी व बल्लारपूर
गोंदिया :- आमगांव,देवरी,सालेकसा व गोंदिया
वर्धा :- कारंजा
भंडारा :- मोहाडी व तुमसर
- नाशिक महसूल विभाग👇
नाशिक :- त्र्यंबकेश्वर,चांदवड व निफाड
- पुणे महसूल विभाग👇
सातारा :- पाटण
सांगली :- शिराळा व वाळवा
- Advertisement -

