Wednesday, September 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता राज्यातील अंगणवाड्यांमध्ये बालकांकरिता नवे अभ्यासक्रम..

आता राज्यातील अंगणवाड्यांमध्ये बालकांकरिता नवे अभ्यासक्रम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-अंगणवाड्यांमध्ये तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांकरिता नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ‘आधारशिला’ या नावाने हा अभ्यासक्रम लागू केला असून याची अंमलबजावणी शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून केली जाणार आहे.आधारशिला अभ्यासक्रमाची रचना ही केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने केली आहे.या अभ्याक्रमात ‘आधारशिला बालवाटिका-१’, ‘आधारशिला बालवाटिका-२’ व ‘आधारशिला बालवाटिका-३’ या नावाने हा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे.या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक हस्तपुस्तिका,प्रशिक्षण साहित्य व आनुषंगिक साहित्य अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षणाच्या वेळी उपलब्ध करून दिले जाणार आहे.बालकांना पहिल्या वर्गाकरिता शैक्षणिकदृष्ट्या तयार करणे या अभ्यासक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.या साहित्याच्या आधारे अंगणवाड्यांमध्ये अभ्यासक्रमाची वर्षभर अंमलबजावणी केली जाईल.त्यानंतर या साहित्याच्या उपयोगिता व परिणामकारतेचे मूल्यमापन केले जाईल.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांमार्फत हे मूल्यमापन केले जाणार आहे.या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.यासाठी अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!