Friday, June 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक सदानंद दाते..

आता महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक सदानंद दाते..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या डीजीपी म्हणजेच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ आज,बुधवार ३१ डिसेंबर रोजी संपत असून आता राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून सदानंद दाते यांची वर्णी लागली आहे.दाते हे येत्या ३ जानेवारीला पदभार स्वीकारणार आहेत.१९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांना त्यांच्या मूळ कॅडरमध्ये परतण्यास केंद्र सरकारने अलीकडेच मान्यता दिली आहे.सदानंद दाते यांनी यापूर्वी राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे(एटीएस) नेतृत्व केले आहे आणि मुंबईत सह
पोलिस आयुक्त (गुन्हे)आणि सह पोलिस आयुक्त
(कायदा आणि सुव्यवस्था)म्हणून काम केले आहे.
एनआयए प्रमुख होण्यापूर्वी,सदानंद दाते यांनी
महाराष्ट्रात दहशतवाद विरोधी पथकाचे(एटीएस)
प्रमुख म्हणून काम पाहिले.त्यांनी महाराष्ट्रात अनेक
महत्त्वाची पदे भूषवली आहेत,ज्यात मीरा-भाईंदर
आणि वसई-विरारचे पोलिस आयुक्त,सहआयुक्त
(कायदा आणि सुव्यवस्था)आणि मुंबईतील गुन्हे
शाखेचे सहआयुक्त यांचा समावेश आहे.त्यांनी
सीबीआयमध्ये उपमहानिरीक्षक आणि केंद्रीय
राखीव पोलिस दलात(सीआरपीएफ) लमहानिरीक्षक
म्हणूनही काम केले आहे.सदानंद दाते यांचा कार्यकाळ  २०२७ च्या अखेरपर्यंत असणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!