Friday, May 1, 2026
Homeनागपूरआता चेहऱ्याचे स्कॅनिंग करून होणार विमानतळावर प्रवेश..

आता चेहऱ्याचे स्कॅनिंग करून होणार विमानतळावर प्रवेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एआय आधारित ‘फेशियल रिकग्निशन सिस्टिम'(एफआरएस)लागू करण्याचा प्रस्ताव ‘सीआयएसएफ’ने दिला आहे.या प्रणालीमुळे प्रवाशांचा प्रवास केवळ सुलभच होणार नाही,तर विमानतळाची सुरक्षा व्यवस्थाही अभेद्य होणार असल्याने विमानतळावरील लांबलचक रांगा,कागदपत्रे तपासण्याचा कंटाळवाणा प्रवास आणि सुरक्षेचा ताण आता लवकरच इतिहासजमा होणार आहे.सदरची अत्याधुनिक प्रणाली प्रवाशांच्या चेहऱ्याचे स्कॅनिंग करेल.विशेष म्हणजे,हे सॉफ्टवेअर देशभरातील पोलिस आणि गुन्हेगारी रेकॉर्डच्या डेटाबेसशी जोडलेले असेल. विमानतळावर प्रवेश करताच संशयित व्यक्ती किंवा गुन्हेगारांची ओळख पटवणे यामुळे सोपे होणार आहे.या प्रणालीसाठी विमानतळावर नवीन कॅमेरे बसवण्याची फारशी गरज भासणार नाही.सध्या असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये केवळ एआय सॉफ्टवेअर अपडेट करून ही यंत्रणा कार्यान्वित करता येईल.यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार आहे.दिल्ली,मुंबई आणि बेंगळुरू सारख्या मोठ्या शहरांमध्ये आधीच ‘डिजीयात्रा’ ॲपद्वारे ही सुविधा दिली जात आहे. नागपूरमध्येही ही यंत्रणा आल्यास प्रवाशांना कागदपत्रे न दाखवता केवळ चेहऱ्याच्या स्कॅनिंगवर प्रवेश मिळेल. तंत्रज्ञानाच्या मदतीने नागपूर विमानतळ आता जागतिक दर्जाच्या सुरक्षा मानकांशी जोडले जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!