Wednesday, October 21, 2026
Homeगडचिरोलीआता अनुदानित खतांचे मोबाईलवरून होणार बुकिंग; बुकिंगनंतर तीन दिवसांत खत खरेदीची सुविधा..

आता अनुदानित खतांचे मोबाईलवरून होणार बुकिंग; बुकिंगनंतर तीन दिवसांत खत खरेदीची सुविधा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील खत विक्री प्रक्रिया अधिक पारदर्शक,सुलभ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी रब्बी हंगाम २०२६ मध्ये येत्या,गुरुवार २२ ऑक्टोंबर पासून ‘एफएफएस’(फार्मर फर्टिलायझर सिस्टीम)ही डिजिटल प्रणाली लागू करण्यात येणार आहे.या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना मोबाईलवरून अनुदानित खतांचे ऑनलाइन बुकिंग करता येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
शेतकऱ्यांनी Google Play Store वरून ‘FFS’ अ‍ॅप डाउनलोड करून स्वतःची नोंदणी करावी.नोंदणी करतांना जमीन व पिकांची अचूक माहिती भरून आवश्यक अनुदानित खतांचे ऑनलाइन बुकिंग करावे.
बुकिंग केल्यानंतर पुढील तीन दिवसांत शेतकरी किंवा त्यांचे प्रतिनिधी संबंधित कृषी सेवा केंद्रावर जाऊन खत खरेदी करू शकतील.प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी अ‍ॅपमधील ‘क्यूआर कोड’ अधिकृत खत विक्रेत्याला दाखवावा लागेल.त्यानंतर विक्रेत्यामार्फत खत विक्रीची डिजिटल नोंद केली जाईल.या व्यवस्थेमुळे खत खरेदीचे नियोजन सुलभ होऊन कृषी सेवा केंद्रांवरील गर्दी व प्रतीक्षेचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे.
अ‍ॅप डाउनलोड करणे, ‘फार्मर आयडी’ तयार करणे, जमीन व पिकांची नोंद करणे किंवा ऑनलाइन बुकिंग प्रक्रियेत अडचण आल्यास संबंधित तालुक्यातील गुणनियंत्रण निरीक्षक अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,गडचिरोली यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतात धान कापण्यासाठी गेली ती परतलीच नाही; वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातून ऐन सणाच्या दिवशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.शेतावर धान कापणीसाठी गेलेल्या वृध्द महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार...

गडचिरोली सायबर कमांडो पथकाची उल्लेखनीय कामगिरी.. -हरवलेले तब्बल ६ लाख रुपये किंमतीचे २१ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विजयादशमी हा सण सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईट प्रवृत्तींवर विजय मिळविण्याचा संदेश देतो.याच शुभमुहूर्तावर आज गडचिरोली पोलीस स्टेशनने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद...

देसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा.. -दहा दिवसांत निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-सन २०२६ च्या खरीप हंगामात अनियमित पाऊस,वाढते तापमान,वादळ,कीड व रोगांचा प्रादुर्भाव तसेच वन्यप्राण्यांमुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर देसाईगंज...

‘तिच्या’ त्रासाला अन् वादाला वैतागला; शिक्षकाने केली प्रेयसीची हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध असलेल्या प्रेमाचा शेवट अखेर प्रेयसीच्या हत्येने झाल्याची घटना नुकतीच चंद्रपुरात उघडकीस आली.प्रेयसीच्या हत्येप्रकरणी आरोपी शिक्षकास अटक करून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!