- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके याला शिक्षक पदाचा अनुभव नसतांना तसेच शिक्षक म्हणून कोठेही काम केले नसतांना डायरेक्ट मुख्याध्यापक बनविण्यात आले.मुख्याध्यापक पराग पुडके याने नागपूर येथील एस.के.बी.उच्च प्राथमिक,माध्यमिक विद्यामंदिर,यादवनगर या शाळेची बोगस व बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारावर नागपूर शिक्षण विभागाचे उपसंचालक उल्हास नरड यांनी आर्थिक व्यवहार करून चुकीच्या पद्धतीने नानाजी पुडके विद्यालय जेवताळा,ता.लाखनी,जि.भंडारा येथे मुख्याध्यापक पदासाठी मंजुरी दिली.या प्रकरणांमध्ये नागपूरच्या सदर पोलिसांनी उपसंचालक उल्हास नरड यांना शुक्रवार ११ एप्रिल गडचिरोलीतून ताब्यात घेतले.तसेच प्रकरणात मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके, रा.जेवताळा,ता.लाखनी,जि.भंडारा यालाही ताब्यात घेण्यात आले व काल,शनिवार १२ एप्रिलला दोघांनाही नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता नागपूर शिक्षण विभागाचे उपसंचालक उल्हास नरड व मुख्याध्यापक पराग पुडके यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.त्यानुसार मुख्याध्यापक पराग पुडके याला पोलिसी हिसका दाखवताच पोपटासारखा बोलू लागला व बनावट कागदपत्रे तयार करून देणारा,शालार्थ आयडी तयार करून वेतन काढणारे व इतर बाबी त्याने पोलिसांना सांगितल्या.प्रकरणात पोलिसांनी आज,रविवार १३ एप्रिलला शिक्षण विभागाच्या उपसंचालक कार्यालयातील दोन आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी अशा तिघांना अटक केली आहे.अधीक्षक,शिक्षण उपनिरीक्षक व लिपिक या तिघांना आज रविवारी अटक करण्यात आली आहे.त्यामुळे आता अटकेतील आरोपींची संख्या पाच झाली आहे.नीलेश शंकरराव मेश्राम वय ५२ वर्षे, संजय शंकरराव दुधाळकर वय ५३ वर्षे व सुरज पुंजाराम नाईक वय ४० वर्षे अशी आरोपींची नावे आहेत.नीलेश मेश्राम हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक असून,संजय दुधाळकर हा विभागीय उपसंचालक कार्यालयात शिक्षण उपनिरीक्षक तर सुरज नाईक हा लिपीक आहे.
पराग पुडके याने पोलिसांच्या चौकशीत सांगितले की,
नीलेश मेश्राम याने पराग पुडके याचे बनावट कागदपत्र तयार करून देऊन सुरुवातीला शिक्षक म्हणून शाळेत नेमणूक दाखविली.त्यासाठी त्याने पराग पुडके याच्याकडून १० लाख रुपये घेतले. दरम्यान,त्याच्या पदोन्नतीचा प्रस्ताव उपसंचालक कार्यालयात गेल्यावर तो परस्पर हाताळून उल्हास नरड यांनी संजय आणि सुरजच्या माध्यमातून त्याचा शालार्थ आयडी तयार करण्यासाठी केला.याशिवाय त्याचा पगार सुरू केला. दरम्यान,आज तिघांनाही नागपूरच्या सदर पोलिसांनी चौकशीसा बोलावून घेतले होते.त्यानंतर त्यांना ताब्यात घेत,४२०,४६५,४६८, ४७१,४७२,४९,१२० (ब) व ३४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
- Advertisement -