मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह विविध महत्त्वाच्या पदांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
१.रविंद्र खेबुडकर- मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांची आयुक्त,भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा(GSDA),पुणे येथे नियुक्ती.
२.गजेंद्र बावणे- आयुक्त, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (GSDA), पुणे यांची संयुक्त व्यवस्थापकीय संचालक,महावितरण,छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती.
३.डॉ.अपूर्वा बसूर- प्रकल्प अधिकारी(आदिवासी विकास प्रकल्प)व सहाय्यक जिल्हाधिकारी,जव्हार (पालघर) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे नियुक्ती.
४.विशाल खत्री- प्रकल्प अधिकारी (आदिवासी विकास प्रकल्प) व सहाय्यक जिल्हाधिकारी, डहाणू (पालघर)यांची मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO), जिल्हा परिषद यवतमाळ येथे नियुक्ती.
५.डोनुरु अनन्या रेड्डी- सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी,नांदेड यांची प्रकल्प अधिकारी (आदिवासी विकास प्रकल्प) व सहाय्यक जिल्हाधिकारी,डहाणू (पालघर)येथे नियुक्ती.
६.पी.के.सिद्धार्थ रामकुमार- सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी,नाशिक यांची प्रकल्प अधिकारी (आदिवासी विकास प्रकल्प)व सहाय्यक जिल्हाधिकारी,जव्हार (पालघर)येथे नियुक्ती.
७.कुश मोटवानी- सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी,नागपूर यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, वर्धा उपविभाग येथे नियुक्ती.
८.आकाश वर्मा- सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी,वाशिम यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी उपविभाग(चंद्रपूर)येथे नियुक्ती.
९.नंदला साईकिरण- सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी,गोंदिया यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, भंडारा उपविभाग येथे नियुक्ती.
१०.योगेश कुमार मीना- सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी,हिंगोली यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, जळगाव उपविभाग येथे नियुक्ती.
११.शिवांश सिंह- सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी,नंदुरबार यांची प्रकल्प अधिकारी (आदिवासी विकास प्रकल्प)व सहाय्यक जिल्हाधिकारी,अहेरी(गडचिरोली)येथे नियुक्ती.
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

