- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकत्याच केरळ येथील वायनाडमध्ये झालेल्या लोकसभेच्या पोट निवडणुकीत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या.त्यांना ६.२२ लाखांहून अधिक मते मिळाली आहेत.भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सत्यन मोकेरी यांच्यापेक्षा त्यांना ४ लाखांहून अधिक आणि भाजपच्या नव्या हरिदास यांच्यापेक्षा ५.१२ लाखांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत.संसदेतील गांधी घराण्यातील त्या तिसऱ्या सदस्या ठरल्या आहेत.त्यांची आई सोनिया गांधी या राजस्थानमधून पक्षाच्या राज्यसभा खासदार आहेत.तर भाऊ राहुल गांधी रायबरेलीमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आज,गुरुवार दिनांक-२८ नोव्हेंबरला लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली.केरळमधील पारंपरिक साडी परिधान करून आणि हातात संविधानाची प्रत घेऊन त्या सभागृहात दाखल झाल्या होत्या.त्याचबरोबर महाराष्ट्रातील नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले रविंद्र चव्हाण यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
आज गुरुवारी लोकसभेचे कामकाज सुरु झाल्यावर पहिल्यांदा दोन्ही खासदारांना शपथ देण्यात आली. प्रियंका गांधी यांनी हिंदीतून तर रविंद्र चव्हाण यांनी मराठीतून खासदारकीची शपथ घेतली.खासदारकीची शपथ घेताना प्रियंका गांधी यांच्या हातात भारतीय संविधानाची प्रत होती.प्रियांका गांधी जेव्हा पद आणि गोपनीयतेची शपथ घेत होत्या; तेव्हा त्यांचे भाऊ राहुल गांधी आणि आई सोनिया गांधी देखील उपस्थित होत्या.आता सोनिया गांधी,राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे तिघेही खासदार म्हणून संसदेत उपस्थित राहणार आहेत.
- Advertisement -