Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोलीबाल न्याय अधिनियमाची पुर्तता न करता दत्तक विधान केल्यास ३ वर्षापर्यंत कैद.....

बाल न्याय अधिनियमाची पुर्तता न करता दत्तक विधान केल्यास ३ वर्षापर्यंत कैद.. – दत्तक इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करण्याचे आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-बाल न्याय अधिनियमाची पुर्तता न करता दत्तक विधान केल्यास संबंधित व्यक्ती ३ वर्षापर्यंत कैद किंवा १ लाख रुपयापर्यत दंड किंवा दोन्ही शिक्षेस पात्र ठरेल,तसेच कोणत्याही उद्देशाने बालकांची विक्री किंवा खरेदी केल्यास अशा व्यक्तींना ५ वर्षापर्यंत सश्रम कारावास आणि १ लाख रूपयांपर्यत दंडाची शिक्षेचे प्रावधान असल्याने दत्तक इच्छुक पालकांनी कायदेशीररित्या दत्तक विधानाची प्रक्रिया पुर्ण करून दत्तक विधान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये लडु दत्तक विशेष संस्था, बंजरंग नगर गडचिरोली ही एक मान्यता प्राप्त विशेष दत्तक संस्था कार्यरत आहे.दत्तक इच्छुक पालकांनी कायदेशीर दत्तक घेण्याकरीता विशेष दत्तक संस्था, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व बाल कल्याण समितीमार्फत देशातील व विदेशातील भावी पालकांना बालके दत्तक देण्याचे कार्य चालु आहे.यासाठी दत्तक इच्छुक पालकांनी www.cara.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
दत्तक इच्छुक पालकांनी कायदेशीर दत्तक प्रक्रिया पुर्ण करण्याकरिता बालगृहे,विशेष दत्तक संस्था, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय जिल्हा बाल संरक्षण कक्ष,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांच्यांशी अधिक माहीतीकरीता संपर्क साधावा.कार्यालय पत्ता बॅरेक क्रमांक ०१,खोली क्रमांक-२६,२७ कलेक्टर कॉम्पलेक्स गडचिरोली दुरध्वनी क्रमांक:- ०७१३२-२२२६४५ यावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रकाश भांदककर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!