Monday, July 13, 2026
Homeनागपूरआज नागपुरात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन.. - सप्तखंजिरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज ...

आज नागपुरात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन.. – सप्तखंजिरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज होणार सहभागी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-नीटच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा,या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आज, मंगळवार १६ जून २०२६ रोजी दुपारी चार वाजता नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके,सप्तखंजिरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज सहभागी होणार आहेत.त्याचबरोबर, वर्धा जिल्ह्यात स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक असलेले नितेश कराळे सहभागी होणार असल्याने नागपूर शहर पोलिसांच्या वतीने तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.कॉक्रोच जनता पार्टीच्या मते नीटची प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे देशातील परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या प्रकरणात जबाबदारी निश्चित करून शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,अशी मागणी पक्षाने केली आहे.या आंदोलनात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आवाहन केले आहे. तसेच शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये पत्रके वाटून आंदोलनाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविली आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला परवानगी देतांना पोलिसांनी आंदोलकांना विविध अटी घालून दिल्या असून कुठल्याही प्रकारचे प्रक्षोभक वक्तव्य,चेंगराचेंगरी, विनयभंग,नारेबाजी होणार नाही याची काळजी घेण्याची नोटीस दिली आहे.आंदोलनासाठी शंभर पोलिस अधिकारी व सहाशे पोलिसांचा बंदोबस्त आहे; असे नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ.रवींद्र कुमार सिंगल स्पष्ट केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!