Saturday, October 3, 2026
Homeगडचिरोलीआजही गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडीसह शाळांना सुट्टी जाहीर…

आजही गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडीसह शाळांना सुट्टी जाहीर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-जिल्ह्यात ४ दिवसांपासून मुसळधार पाऊसासह अतिवृष्टी झालेली असून वैनगंगा, गोदावरी,प्राणहिता, बांडिया, इंद्रावती इ.नद्यांच्या पाण्याची पातळी ही वाढत असून सदर पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर आल्याने ३३ मार्ग बंद आहेत.शिवाय गोसेखुर्द धरणातून सध्या सुरु असलेले विसर्ग व वैनगंगा,प्राणहिता, गोदावरी नदीच्या वाढत्या पाण्याची पातळी बघता जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे.त्यानुसार प्राप्त अधिकारांचा वापर करुन पूरपरिस्थितीवर उचित प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत गडचिरोली जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा,जिल्हा परिषद शाळा,नगरपालिका शाळा, अनुदानित व विना अनुदानित शाळा,सर्व आश्रमशाळा,सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र,यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण गडचिरोली जिल्हा सीमाक्षेत्रामध्ये आज,दिनांक-२३ जुलै,२०२४, मंगळवार रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सदर आदेशाचे पालन न करणारी,उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती,संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र राहणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!