Sunday, September 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या नोंदीसह हलका पाऊस झाला.तर गडचिरोली जिल्ह्यातही ५.७ मिमी सरासरी पावसाच्या नोंदीसह देसाईगंज,कोरची,आरमोरी व कुरखेडा तालुक्यांत दमदार पावसाने हजेरी लावली.अश्यातच आता हवामान खात्याने आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी नागपूर,भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांत चोवीस तासांसाठी पावसाचे ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.या भागात गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.त्यातच,गोंदिया व अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज असून हवामान खात्याने दोन्ही जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.विशेषतः विदर्भात पावसाळी स्थिती तयार झाल्याने आजपासून विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण राहणार आहे.पावसाळी वातावरण शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!