Friday, October 23, 2026
Homeकुरखेडाआंधळी-नवरगाव येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची भेट; गावातील समस्यांचा घेतला आढावा -बालग्रामसभा व...

आंधळी-नवरगाव येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची भेट; गावातील समस्यांचा घेतला आढावा -बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या निवेदनाची दखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी काळजी प्रकल्पांतर्गत आयोजित बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या माध्यमातून कुरखेडा तालुक्याच्या आंधळी नवरगाव येथील नागरिकांनी मांडलेल्या बससेवा,शिक्षण,आरोग्य व मूलभूत सुविधांच्या समस्यांची दखल घेत जिल्हा परिषद गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन आढावा घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बाणाईत,पाटील,लेनगुरे,महिला व बालविकास अधिकारी बांबोळे,पर्यवेक्षिका पुरते आदी उपस्थित होते.दरम्यान,गावकरी व बालकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि मागण्यांवर चर्चा करण्यात आली.तसेच अंगणवाडी,जिल्हा परिषद शाळा आणि आरोग्य उपकेंद्राची पाहणी करण्यात आली व समस्यांवर लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.
  • मुलांच्या बससेवेचा प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू👇
बालग्रामसभेत विद्यार्थ्यांनी बससेवेचा प्रश्न प्रशासनासमोर मांडला होता.या मागणीची दखल घेत विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद गडचिरोली येथे भेटीसाठी निमंत्रित करण्यात आले.रुद्र किशोर कराडे,चंदू प्रभाकर लाडे,चेतन जानबा लाडे,मंथन मेश्राम आणि विश्रांती दुपजारे या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.बससेवेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढील पाठपुरावा करण्यात येणार आहे.
यावेळी माजी सरपंच उज्वला रायसिडाम,माजी उपसरपंच अप्रव भैसारे,सैदूल टेकाम,उद्धव पाटील कवाडकर,दशरथ लाडे,नानाजी खुणे,संघमित्रा कराडे, रोशनी लाडे,सुप्रिया बन्सोड,माया कोचे,जयश्री लाडे, सुजाता कराडे तसेच गावातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्रव भैसारे यांनी केले.तर संचालन कन्नाके यांनी व आभार जगदीश मानकर यांनी मानले.बालकांच्या पुढाकाराला प्रशासनाची दखल मिळाल्याने गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून,समस्यांच्या पाठपुराव्याला पुढेही गती दिली जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आमदार विजय वडेट्टीवार.. – थकाबाई तलावातून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा; १३५ कोटींच्या सिंचन निधीचीही घोषणा..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम ​सिंदेवाही(चंद्रपूर):-धानाचे पीक अंतिम टप्प्यात असतांना सिंचनासाठी पाण्याची तीव्र गरज निर्माण झाल्याने सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले होते.शेतकऱ्यांची ही बिकट परिस्थिती लक्षात...

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; कोलकाता व ठाणे येथील कुटुंबीयांनी स्वीकारले पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विशेष दत्तक संस्थेच्या देखरेखीतील दोन बालकांना आज गुरुवारी हक्काचे कुटुंब आणि मायेची ऊब मिळाली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दत्तक आदेशांवर स्वाक्षरी करून...

भारतीय वन सेवेतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय वन सेवेतील सन २०२४ च्या तुकडीतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.या संदर्भात आज,गुरुवार २२ ऑक्टोंबर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!