Thursday, October 22, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना 'या' योजनेंतर्गत मिळतात २ लाख ५० हजार रुपये..

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ‘या’ योजनेंतर्गत मिळतात २ लाख ५० हजार रुपये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना त्या-त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागाकडून ५० हजार रुपये मिळतात, हे बरेच जणांना माहीत आहे.पण,एका योजनेतून नुकतेच आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना २ लाख ५० हजार रुपये मिळतात,याची अनेकांना माहितीच नाही. कोणत्याही जातीतील युवक वा युवतीने दलित समुदायातील व्यक्तीसोबत विवाह केले,तर त्या जोडप्याला अडीच लाखांची आर्थिक मदत दिली जाते. सदरची योजना ही ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्कीम फॉर सोशल इंटिग्रेशन थ्रू इंटर कास्ट मॅरेजेस’ नावाने २०१३ पासून आजही सुरू आहे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनद्वारे सर्वत्र राबवली जात आहे.या योजनेंतर्गत दिली जाणारी मदत ही फक्त पहिल्या विवाहासाठी दिली जाते.विवाहानंतर एका वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे.तसेच विवाह करणाऱ्या दोघांपैकी एक व्यक्ती दलित समुदायातील असणे आवश्यक आहे.त्यातच,विवाह हिंदू मॅरेज ॲक्ट,१९५५ अंतर्गत नोंदणीकृत असावे.विशेष म्हणजे,आंतरजातीय विवाह केल्यानंतर शासनाकडून वा इतर योजनेतून लाभ घेतला असेल तर तेवढी रक्कम अडीच लाखातून कपात करून उर्वरित रक्कम जोडप्यांना दिली जाते.अडीच लाख रुपये हे दोन टप्प्यात वितरीत करण्यात येतात. पहिल्या टप्प्यात दीड लाख रुपये थेट जोडप्याच्या जॉइंट बँक खात्यात जमा केले जातात.तर उर्वरित एक लाख रुपये हे तीन वर्षांसाठी ‘एफ डी’ म्हणजेच मुदत ठेव म्हणून ठेवली जाते व तीन  वर्षांनंतर,व्याजासह ती रक्कम जोडप्याला दिली जाते.यासाठी विवाह प्रमाणपत्र, जोडीदाराचे जात प्रमाणपत्र,पहिल्या लग्नाचे प्रमाणपत्र/स्वतःचे प्रतिज्ञापत्र,उत्पन्न प्रमाणपत्र,जॉइंट बँक अकाऊंट इत्यादी कागदपत्रे आवश्यक असून आंतरजातीय विवाह करणारे जोडपे तीन प्रकारे अर्ज करू शकतात.आपल्या खासदार किंवा आमदाराच्या शिफारशीसह अर्ज पाठवू शकता.जिल्हा प्रशासन किंवा राज्य सरकारमार्फत अर्ज सादर करू शकता किंवा थेट डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता.
माहितीसाठी वेबसाईट👇
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  अमरावती :-एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज,बुधवार २१ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास अमरावती शहरात उघडकीस...

पदवीधर मतदारसंघ निवडणूक; आता खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष सवलत.. -जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून निवडणूक साहित्य वाटप व्यवस्था व स्ट्राँग रूमची पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या दोन तासांऐवजी आता चार...

शाळांना ‘या’ तारखेपासून लागणार दिवाळीच्या सुट्ट्या..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शाळांच्या...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ लोकनाट्यास सातवा राज्यस्तरीय पुरस्कार.. – मुंबई येथे होणार सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठान,चेंबूर(मुंबई) या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना प्रतिष्ठानच्या वार्षिक साहित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!