- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-अवैध सुगंधित तंबाखूची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या एका तंबाखू माफियाला पोलिसांनी अखेर तडीपार केले.त्याला महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१)(अ)(ब) अंतर्गत चार महिन्यांसाठी नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
हरीश राजेश चमेडीया वय ३५ वर्षे,रा.भिवापूर,जि. नागपूर असे तडीपार करण्यात आलेल्या तंबाखू माफियाचे नाव आहे.हरीश हा गेल्या अनेक वर्षापासून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर वाहतूक व विक्रीच्या गोरखधंद्यात सक्रिय होता.त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे नोंदले आहेत.पोलिसांनी त्याच्या गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाया केल्या,मात्र तरीही त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नाही.उलट,त्याची गुन्हेगारी पावले सातत्याने पुढेच पडत राहिल्याने परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.यामुळे भिवापूर पोलिसांनी उमरेड उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्फत उमरेडचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी (एसडीओ)यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता.प्रस्तावाची छाननी करून मंजूर करत अखेर पोलिसांनी त्याला जिल्ह्यातून तडीपार करण्यासाठी कंबर कसली आणि जिल्ह्यातून ‘गेट आउट’ केले.
- Advertisement -

