उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
कुरखेडा(गडचिरोली) :- गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात शासनाच्या अवैध गौण खनिजांची चोरी करणाऱ्या चोरट्यांविरोधात महसूल विभागाने कारवाईचा सपाटा लावताच; अवैधरीत्या रेती उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.अशातच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ गणल्या जाणाऱ्या पत्रकारांना ‘चोरी तर चोरी वर शिणाजोरी’ करणारे बातमी प्रकाशित केली म्हणून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याने आज १३ जून २०२३ रोजी कुरखेडा येथील स्थानिक पत्रकार संघाच्या वतीने पोलीस स्टेशन कूरखेडा येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कुरखेडा येथील तहसीलदार राजकुमार धनबाते व महसूल विभागाचे भरारी पथकाने शनिवारी १० जून २०२३ रोजी रात्री अवैध रेती वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर वाहतूक दारांवर कारवाई केली.मात्र त्यातील एक ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पोबारा करून पळून गेला.याबाबत कुरखेडा येथील स्थानिक पत्रकारांनी वृत्त प्रकाशित केले होते.त्यानुसार गुंड प्रवृत्तीचा कुरखेडा शहरापासून काही अंतरावर असलेल्या कूंभीटोला येथील देवानंद रेवनाथ नाकाडे याने कूंभीटोला येथील निवासी असलेल्या एका पत्रकाराच्या घरासमोर त्यांच्या घरातील महिला व अन्य पूरूष मंडळी उपस्थित असतांना अश्लील व अत्यंत खालच्या पातळीची शिवीगाळ पत्रकारांना उद्देशून केली असल्याने त्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार त्वरित कारवाई करावी; अशी तक्रार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सिराज पठाण,सचिव नासीर हाश्मी,सह सचिव प्रा.विनोद नागपूरकर,सदस्य विजय भैसारे,महेन्द्र लाडे,कृष्णाजी चौधरी,ताहीर शेख, शिवा भोयर,चेतन गहाणे,सूरज गावतूरे यांनी केली आहे.