Friday, September 4, 2026
Homeनागपूरअवैध दारू विक्रीसह नागरिकांना दमदाटी करणे महिलेला पडले महागात... -सहा महिन्यांसाठी तडीपार..

अवैध दारू विक्रीसह नागरिकांना दमदाटी करणे महिलेला पडले महागात… -सहा महिन्यांसाठी तडीपार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-कामठी शहरातील रामगड परिसरात अवैधरीत्या दारूविक्री करणे तसेच नागरिकांना दमदाटी करीत मारहाण करणाऱ्या गुन्हेगार महिलेला नागपूर शहर पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्या आदेशान्वये सहा महिन्यांसाठी नागपूर शहर व जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.तिला भंडारा जिल्ह्यात सोडण्यात आले आहे.
नलिनी ऊर्फ सोनी वय २८ वर्षे,रा.विकुत्तबाबा नगर,अनाज गोदामजवळ,रामगड,कामठी असे तडीपार करण्यात आलेल्या गन्हेगार महिलेचे नाव आहे.ती काही वर्षांपासून कामठी शहरातील रामगड भागात अवैध दारूविक्री करते.ती नागरिकांना दमदाटी करण्यासोबतच मारहाणदेखील करते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.तिच्या विरोधात सन २०१९ पासून पोलिसांत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.मध्यंतरी तिच्या विरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली तर अधूनमधून अटकही केली.
वारंवार सूचना देऊनही तिच्या वर्तनात बदल होत नसल्याने कामठी (नवीन) चे ठाणेदार प्रमोद पोरे यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी तिला तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्याकडे सादर केला.कदम यांनी मंजुरी देताच पोलिसांनी तिला शिताफीने ताब्यात घेत तिला सुनंदा अशोक मेश्राम वय ५० वर्षे, रा.मुजबी, ता.भंडारा,जि.भंडारा नामक नातेवाइकाकडे सोडण्यात आले.या काळात तिला नजीकच्या पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.ही कारवाई हेडकॉन्स्टेबल देवेंद्र सारवे,दीप्ती मोटघरे, दिनेश पांडे यांनी पार पाडली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!