Saturday, May 30, 2026
Homeदेसाईगंजअवैध तंबाखूची वाहतूक करतांना दोघे सापडले; एकजण देसाईगंजचा तर दुसरा कुरुड गावचा..

अवैध तंबाखूची वाहतूक करतांना दोघे सापडले; एकजण देसाईगंजचा तर दुसरा कुरुड गावचा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या देसाईगंज व कुरुड गावातील तरुणाच्या गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.रितेश रामलाल नागदेवे वय ४५ वर्षे,रा.देसाईगंज,जि.गडचिरोली व नेताजी लोचन गणवीर वय ३२ वर्षे,रा.कुरुड, ता.देसाईगंज,जि.गडचिरोली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून दोघांवर भारतीय न्यायसंहिता कलम १२३,२१४,२२३, २७४,२७५,अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम कलम २६(२)(आय),२६(२)(आयव्ही),२७(३)(ब),३(१)(झेडझेड) (आयव्ही),२७ (३)(ड),३(२)(३),५९ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदरची कारवाई ही गोंदिया जिल्ह्याच्या बालाघाट मार्गावरील विजयनगर परिसरात काल बुधवारी करण्यात आली.चारचाकी वाहनासह सुगंधित तंबाखूचे १ हजार ८०० डब्बे असा एकूण १२ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैधरीत्या सुगंधित तंबाखूची वाहतूक करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास  मिळाली होती.या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोंदिया बालाघाट मार्गावरील विजयनगर येथे नाकाबंदी केली.टाटा नेक्सॉन चारचाकी वाहन क्रमांक एमएच ३५ एसी ६३६९ हा संशयित वाहन येताच वाहनाची तपासणी केली असता,९ नग खाकी रंगाचे खरडे बॉक्स,त्यात प्रत्येक बॉक्समध्ये २०० डब्बे असा एकूण २ लाख ७० हजार रूपये व वाहनाची किंमत १० लाख रुपये असा एकूण १२ लाख ७० हजारांचा माल जप्त करण्यात आला.सदरची कारवाई ही गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय धिरज राजुरकर, पोलिस हवालदार संजय चव्हाण, सहाय्यक फौजदार राजू मिश्रा,सोमेंद्रसिंह तुरकर, तुलसीदास लुटे, दीक्षितकुमार दमाहे,राकेश इंदुरकर, चालक पोलिस शिपाई राम खंडारे यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

रखरखत्या उन्हात शेतातच टाकली खाट अन् उपोषणास केली सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसून आज,शनिवार ३० मे पासून सकाळी दहा वाजे जालना...

लाखांदूर-देसाईगंज मार्गावर पेटत्या कारचा थरार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर-देसाईगंज मार्गावरील दुर्गा माता मंदिर पहाडीजवळ भर उन्हात पेटत्या कारचा थरार काल शुक्रवारी घडला.लाखांदूरहून निघालेली कार सोनी-चप्राळ पहाडीजवळ येताच धावत्या...

आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा नदीत बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील वणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, शुक्रवार २९ मे रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!