Monday, August 31, 2026
Homeनागपूरधावती कार पेटत राहिली अन् लोकं व्हिडिओ काढत राहिले..

धावती कार पेटत राहिली अन् लोकं व्हिडिओ काढत राहिले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका धावत्या कारने अचानकपणे पेट घेत अवघ्या काही मिनिटांतच जळून खाक झाल्याची घटना नागपूरच्या वर्धा रोडवरील जयप्रकाश मेट्रो स्टेशनजवळील डबलडेकर फ्लायओव्हरवर घडली. कार चालकाने प्रसंगावधान राखत पटकन उडी मारून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.पण,धावती कार पेटत राहिली आणि काही लोकं मदत करण्याऐवजी व्हिडिओ काढत राहिल्याने माणुसकीची संवेदनशीलता उघड झाली.
अमजद खान इब्राहिम खान वय ३२,रा. बसंतनगर, पुसद,यवतमाळ हे एमएच २९ ०२८८ क्रमांकाच्या
स्वीफ्ट डिझायर कारने यशोधरानगर येथील रुग्णालयात नातेवाइकाला भेटून परत पुसदकडे जात होते.अश्यातच सायंकाळी ७.३० च्या सुमारास फ्लायओव्हरवर पोहोचताच कारच्या बोनटमधून धूर निघतांना दिसला. प्रसंगी त्यांनी तात्काळ वाहन रस्त्याच्या कडेला थांबवण्याचा प्रयत्न केला.मात्र,याचवेळी कारचे दरवाजे लॉक झाले.कसेबसे बाहेर पडताच काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण कार पूर्णपणे जळून खाक झाली.या घटनेमुळे फ्लायओव्हरवर वाहनांची मोठी रांग लागून वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान,बेसा-पिपळा नगरपंचायतीच्या जलपुरवठा अभियंता पूजा जाधव या घरी जात असतांना अजनी ते एअरपोर्टदरम्यान फ्लायओव्हरवर कारला आग लागलेली दिसली.त्यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला कळविले. तसेच अग्निशमन अधिकारी संकेत प्रमोद माटे यांनाही माहिती दिल्यानंतर तातडीने अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना केले.मात्र,काही जण मदत करण्याऐवजी व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते. अग्निशमन दलाच्या बेसा-पिपळा व नरेंद्रनगर केंद्रातून दोन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली.मात्र,तोपर्यंत कारचे मोठे नुकसान झाले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!