- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बिहार विधानसभा निवडणुकांचा काल शुक्रवारी निकाल जाहीर करण्यात आला.निकालाने विरोधकांची बोलती बंद झाली असून बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीने एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित करत मोठा विजय मिळवला आहे.एकूण २४३ जागांपैकी तब्बल २०२ जागांवर एनडीएने बाजी मारत स्पष्ट बहुमत मिळवले, ज्यात भाजप,जेडीयू (जनता दल युनायटेड)आणि लोजप (लोकजनशक्ती पार्टी)या पक्षांचा निर्णायक वाटा आहे. भाजपला ८९,जेडीयूला ८५,तर लोजपला १९ व इतर पक्षांनी ९ जागा मिळवत २०२ जागांवर विजय मिळवला. काँग्रेसला केवळ ६ जागा मिळाल्या,तर तेजस्वी यादव यांच्या राजदला २५ जागांवर समाधान मानावे लागले.
एनडीएने बाजी तर मारली,त्यातच त्यांनी दूरदृष्टी ठेवून २५ वर्षीय प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांना अलीनगर मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली. मैथिली ठाकूर या स्टेज शो व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असतात.त्याचा चाहता वर्ग कोट्यवधीच्या वर असून याच चाहत्या वर्गाच्या आधारावर बिजेपीने त्यांना तिकीट दिल्याचे समजते.तिकीट मिळाली आणि नशिबाने साथ देत तब्बल ११ हजार ७३० मताने अलीनगर मतदारसंघातून निवडणूक जिंकली.अवघ्या २५ व्या वर्षीच मैथिली ठाकूर या आमदार झाल्याने बिहार विधानसभेतील सर्वात तरुण आमदार म्हणून त्यांनी ख्याती मिळवली आहे.भाजपच्या तरुण उमेदवार मैथिली ठाकूर यांनी आरजेडीचे उमेदवार विनोद मिश्रा यांचा ११ हजार ७३० मताने पराभव केला.ठाकूर यांना एकूण ८४ हजार ९१५ मते मिळाली,तर मिश्रा यांना ७३ हजार १८५ मतांवर समाधान मानावे लागले.
- लाडक्या बहिणी ठरल्या गेमचेंजर👇
निवडणुकांमध्ये काहीतरी गडबड आहे,त्यामुळेच विरोधकांचे डब्बे घसरू लागल्याच्या टीका अनेकजण करतांना दिसून येतात.पण,बिहारच्या विधानसभा निवडणुका आणि यापूर्वी झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकांवर एक नजर टाकली तर गेमचेंजर म्हणून लाडक्या बहिणींनी महत्वाची भूमिका बजावली आहे.बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएसाठी महिला मतदारांचा कौल अत्यंत निर्णायक ठरला आहे.विशेष म्हणजे,अगदी निवडणुकीच्या जवळ २९ ऑगस्ट २०२५ रोजी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाने महिलांना स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ सुरू केली.या योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात थेट १० हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याचे सांगितल्या गेले आणि २६ ऑक्टोंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी त्यांनी सुरुवातीला ७५ लाख महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी १० हजार रुपये थेट हस्तांतरित केले.त्यानुसार,यातील संख्या वाढून महिला रोजगार योजनेचा फायदा तब्बल दीड कोटी महिलांना झाला. निवडणुकीत एकूण महिला मतदारांपैकी ७१ टक्क्यांहून अधिक महिलांनी मतदान तर केले,पण त्यांच्या कुटुंबीयांनी यात भर घातल्याने विरोधकांची निवडणुकीतील रणनीती कमकुवत झाली आणि एकूण २४३ जागांपैकी तब्बल २०२ जागांवर एनडीएने बाजी मारली.
- Advertisement -

