Tuesday, July 28, 2026
Homeगडचिरोलीअवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला.. - आमदार रामदास मसराम यांची जिल्हाधिकाऱ्यांना...

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला.. – आमदार रामदास मसराम यांची जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला आहे.शेतामध्ये उभे असलेले धान,तूर,सोयाबीन,भाजीपाला आदी पिके पावसामुळे आडवी झाली असून अनेक ठिकाणी पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.या पार्श्वभूमीवर आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी शेतकऱ्यांचे दुःख सावरण्यासाठी गडचिरोली जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.तसेच विधानसभा क्षेत्राच्या देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची या चारही तालुक्यातील तहसीलदारांना यासंदर्भात तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.आमदार मसराम म्हणाले की, “शेतकऱ्यांनी दिवसरात्र घाम गाळून धान पिकांची वाढ केली.अश्यातच अवकाळी पावसाने पिकं नष्ट झाली आहेत. सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत देणे आवश्यक असून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून प्रत्येक शेतकऱ्याला योग्य तो मोबदला द्यावा. तहसीलदार,कृषी अधिकारी व महसूल विभागाचे कर्मचारी यांनी गावागावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त पिकांचे योग्य पंचनामे तयार करावेत,असेही निर्देश आमदार मसराम यांनी दिले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!