Friday, June 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअवकाळीचा फटका; आता कांदा रडवणार..

अवकाळीचा फटका; आता कांदा रडवणार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात अवकाळी पावसाने चांगलेच झोडपल्याने शेतकऱ्यांचा तोंडातील घास हिरावून घेतला आहे.कांदा कापणीपूर्वी आलेल्या अवकाळीने संपूर्ण पीक नष्ट झाले आहे.अश्यातच पावसामुळे साठवणीच्या सोयीअभावी शेतात काढून ठेवलेला कांदाही खराब झाला.यामुळे हजारो टन कांदा सडून,कुजून गेल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे आता येत्या काही दिवसांत कांदा महाग होऊन रडवणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे.महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे आणि नाशिक जिल्हा प्रमुख जयदीप भदाणे यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आलेल्या पत्रात शेतकऱ्यांना प्रति एकर एक लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.याशिवाय,ज्यांनी कांदा कापला मात्र साठवणुकीत खराब झाला,त्यांना प्रति क्विंटल २,००० रुपयांचे अनुदान मिळावे,असेही त्यांनी नमूद केले आहे.पत्रात म्हटले आहे की,६ मे पासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे जळगाव,नाशिक,धुळे, सोलापूर, बीड,पुणे,बुलढाणा, अकोला परभणी,जालना आणि इतर जिल्ह्यांमध्ये कांद्याचे पीक कापणीपूर्वीच वाया गेले आहे.कांद्याचे उत्पादन घटल्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये बाजारात कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.मागणी कायम असतांना पुरवठा घटल्यास भाव वाढतात,हे अलीकडच्या वर्षांत वारंवार दिसून आले आहे.सध्यातरी या विषयावर केंद्र किंवा राज्य सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!