- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास,अशी कमाल शिक्षा सुनावण्यात आली.विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी हा निर्णय दिला.ही घटना बुटीबोरी पोलिसांच्या क्षेत्रातील आहे.
राजू रामदास उपासे वय ३७ वर्षे असे आरोपीचे नाव असून तो रुईखैरी,ता.हिंगणा येथील रहिवासी आहे. व्यवसायाने मजूर असलेल्या उपासेला घरात बळजबरीने प्रवेश करण्याच्या गुन्ह्याकरिता तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास तर, ठार मारण्याची धमकी देण्याच्या गुन्ह्याकरिता दोन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास,अशीही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
घटनेच्या वेळी पीडित मुलगी १४ वर्षे वयाची होती.ती आई-वडिलांसोबत राहत होती.तिचे आई-वडील कंपनी कामगार होते.११ जून २०२२ रोजी सकाळी ते कामावर गेल्यानंतर पीडित मुलगी एकटीच घरात होती. दरम्यान,दुपारी १ च्या सुमारास आरोपीने बळजबरीने तिच्या घरात शिरून दार बंद केले.तसेच, मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला.आरोपी बाहेर निघून गेल्यानंतर मुलीने आई-वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक जगदीश पालिवाल यांनी प्रकरणाचा तपास केला.न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड.सोनाली राऊत यांनी कामकाज पाहिले. त्यांनी विविध पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचे गुन्हे सिद्ध केले.
- Advertisement -